ऑपरेशन सिंदूरमध्ये शहीद झालेल्या सहा वीरांची सरकारकडून प्रथमच अधिकृत घोषणा; राष्ट्रीय युद्ध स्मारकावर कोरली नावं

ऑपरेशन सिंदूरमध्ये शहिद झालेल्या भारतीय जवानांच्या बाबतीत केंद्र सरकारने पहिल्यांदाच अधिकृत माहिती जाहीर केली आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 48

Names of martyrs inscribed on the National War Memorial : भारतीय लष्कराने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये शहिद झालेल्या भारतीय जवानांच्या बाबतीत केंद्र सरकारने पहिल्यांदाच अधिकृत माहिती जाहीर केली आहे. पाकिस्तानमधील दशतवाडी तळांवर करण्यात आलेल्या या कारवाईदरम्यान शहीद झालेल्या पाच लष्करातील जावं आणि एका हवाई दलाच्या जवानाच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.

ऑपरेशन सिंदूरमध्ये देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सहा वीर जवानांच्या शौर्याला अखेर अधिकृत मानवंदना देण्यात आली आहे. केंद्र सरकारने प्रथमच या शहीद जवानांची ओळख सार्वजनिक केली असून, त्यांच्या नावांचा समावेश नवी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या ‘रोल ऑफ ऑनर’मध्ये करण्यात आला आहे. गेल्या वर्षी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले होते. या कारवाईदरम्यान देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांच्या बलिदानाची आता अधिकृत नोंद करण्यात आली आहे.

राम मंदिरातील देणगी अपहारप्रकरणी तपासाला वेग; चंपत राय आणि अनिल मिश्रा यांचा तात्काळ राजीनामा

राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या 2025 या विभागातील वॉल 3D वर या सहा वीर जवानांची नावे कोरण्यात आली आहेत. तसेच राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या अधिकृत संकेतस्थळावरील ‘रोल ऑफ ऑनर’मध्येही त्यांचा समावेश करण्यात आला आहे. शहीद झालेल्या वीरांमध्ये मुख्यालय 10 इन्फंट्री ब्रिगेडचे सुबेदार मेजर पवन कुमार, 4 जम्मू अँड काश्मीर लाइट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार (वीर चक्र), 5 फील्ड रेजिमेंटचे लान्स नाईक दिनेश कुमार, 851 लाइट रेजिमेंटचे एव्हिएशन टेक्निशियन मूड मुरलीनाईक, 237 फील्ड वर्कशॉप कंपनीचे हवालदार सुनील कुमार सिंह आणि भारतीय हवाई दलाच्या 39 विंगचे सार्जंट सुरेंद्र कुमार (वायू पदक) यांचा समावेश आहे.

खासदार हेमंत सावरा यांच्या विकासकामांच रिपोर्ट कार्ड; कोट्यवधींचा निधी, तरी विकासाची गती संथ

राष्ट्रीय युद्ध स्मारकावर या वीर जवानांची नावे कोरण्यात आल्याने ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सशस्त्र दलाला झालेल्या हानीची केंद्र सरकारकडून प्रथमच अधिकृत पुष्टी झाली आहे. यापूर्वी ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यात आली होती, मात्र या कारवाईत शहीद झालेल्या जवानांची ओळख किंवा संख्या अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नव्हती.

या सहा वीरांच्या नावांचा राष्ट्रीय युद्ध स्मारकात समावेश करून देशाने त्यांच्या अद्वितीय शौर्याला आणि सर्वोच्च बलिदानाला अभिवादन केले आहे. भारताच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या या वीरांचे योगदान देश सदैव स्मरणात ठेवेल. ऑपरेशन सिंदूरमधील या सहा शूरवीरांचे बलिदान देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदले गेले आहे. संपूर्ण देश त्यांच्या शौर्याला सलाम करत आहे.

follow us