West Bengal bypolls: ममता बॅनर्जींसाठी नंदीग्राम मतदारसंघ पुन्हा का महत्त्वाचा ?

Mamata Banerjee: नंदीग्राम विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झाला आहे.

  • Ashok Parude
  • Written By: Published:
Mamta Banrjee 1

West Bengal bypolls : पश्चिम बंगालमधील (West Bengal) दोन जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. नंदीग्राम आणि रेजीनगर या दोन विधानसभा मतदारसंघांसाठी 6 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असल्याची घोषणा भारत निवडणूक आयोगाने सोमवारी केलीय. तृणमूल काँग्रेसच्या (TMC) प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee ) नंदीग्राममधून (Nandigram) पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची राजकीय चर्चा सुरू झालीय.

नंदीग्राम विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झाला आहे. तर रेजीनगर विधानसभा मतदारसंघ हुमायून कबीर यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झाला आहे. या दोन्ही जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झालीय. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार या पोटनिवडणुकीची अधिसूचना ९ सप्टेंबर रोजी जारी केली जाईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 16 सप्टेंबर आहे. अर्जांची छाननी 17 सप्टेंबर रोजी होईल, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 19 सप्टेंबर आहे. दोन्ही मतदारसंघांत 6 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणी 9 ऑक्टोबर रोजी होईल.


पोटनिवडणुकांचा बिगुल वाजला; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकाऱ्यांचा बालेकिल्ला भेदण्यासाठी ‘दीदी’ पुन्हा मैदानात उतरणार?

ममता बॅनर्जी पुन्हा पश्चिम बंगाल विधानसभेत परतणार?
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसला पक्षाला मोठे धक्के बसत आहे. तब्बल 19 खासदार पक्ष सोडून गेले आहेत. तर काही आमदार पक्षातून बाहेर पडण्याच्या वाटेवर आहेत. त्यामुळे पक्षाची आणखी पडझड टाळण्यासाठी ममता बॅनर्जी पुन्हा एकदा विधानसभेत जावू शकतात. त्यामुळेच नंदीग्राम पोटनिवडणुकीकडे विशेष लक्ष लागले आहे. कारण या मतदारसंघाचा ममता बॅनर्जी यांच्या राजकीय प्रवासाशी मोठा संबंध आहे. तसेच याच मतदारसंघात ममता बॅनर्जी आणि सुवेंदू अधिकारी यांच्यात यापूर्वी अत्यंत अटीतटीची लढत झाली होती. नुकताच झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा भाजपचे सुवेंदू अधिकारी यांनी 15 हजार 105 मतांनी पराभव केला आहे. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी नंदीग्राम आणि भवानीपूर या दोन्ही मतदारसंघांत विजय मिळवला. त्यानंतर त्यांनी नंदीग्रामच्या आमदारपदाचा राजीनामा देऊन भवानीपूरची जागा कायम ठेवली. त्यामुळे नंदीग्रामची जागा रिक्त झाली आणि आता तेथे पोटनिवडणूक होत आहे. विशेष म्हणजे 2021 च्या विधानसभा निवडणुकीत याच नंदीग्राम मतदारसंघातून सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा पराभव केला होता.


ग्रामीण एलपीजी ग्राहकांना मोठा दिलासा; सिलेंडर बुकिंग 45 दिवसांची अट केली कमी


ममता बॅनर्जींसाठी नंदीग्राम इतका महत्त्वाचा का?

ममता बॅनर्जी यांच्या राजकीय कारकिर्दीत नंदीग्रामला विशेष महत्त्व आहे. 2007 मध्ये नंदीग्राममध्ये प्रस्तावित रासायनिक उद्योग प्रकल्पासाठी शेतजमीन संपादित करण्याच्या तत्कालीन डाव्या आघाडी सरकारच्या निर्णयाविरोधातील आंदोलनाचा ममता बॅनर्जी प्रमुख चेहरा बनल्या होत्या. या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. 14 मार्च 2007 रोजी पोलिसांच्या गोळीबारात 14 ग्रामस्थांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर नंदीग्राममधील आंदोलन अधिक तीव्र झाले आणि अखेर तत्कालीन सरकारला प्रस्तावित प्रकल्प गुंडाळावा लागला. नंदीग्राममधील या आंदोलनामुळे ममता बॅनर्जी यांना राज्यातील डाव्या आघाडीविरोधात मोठी राजकीय ताकद मिळाली आणि पुढे पश्चिम बंगालच्या राजकारणात त्यांचा प्रभाव झपाट्याने वाढून त्या तब्बल 15 वर्षे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री राहिल्या.


या राज्यांमध्येही पोटनिवडणूक

पश्चिम बंगालमधील या दोन जागांव्यतिरिक्त निवडणूक आयोगाने तामिळनाडूमधील दोन विधानसभा मतदारसंघ, पुडुचेरीतील एक आणि आसाममधील एका विधानसभा मतदारसंघासाठीही पोटनिवडणुकीची घोषणा केलीय. आसाममधील नागाव लोकसभा मतदारसंघातही पोटनिवडणूक होणार आहे.

follow us