‘गौतम अदानींच्या फोटो गॅलरीत फिरताना नरेंद्र मोदी’, काँग्रेसचा हल्लाबोल
Congress criticizes Narendra Modi on Gautam Adani photo : कर्नाटक विधानसभा निवडणुका संपल्या आहेत पण त्यानिमित्ताने 2024 च्या लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले आहे. काही महिन्यांत राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसकडून एकमेकांवर आक्रमकपण आरोप केले जात आहेत. भाजप आणि काँग्रेस यांच्यातील सोशल वॉर देखील पाहायला मिळत आहे. दोन्ही पक्ष टीका करण्याची कोणतीही कसर सोडत नाहीत. यादरम्यान काँग्रेसने आपल्या ट्विटर हँडलवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवरुन भाजप आणि काँग्रेसमध्ये ट्विटरवॉर छेडले आहे.
काँग्रेसने एका ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा फोटो शेअर केला होता. या चित्रात अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी (Gautam Adani) यांची छायाचित्रे दोन्ही बाजूला भिंतीवर टांगलेली दिसत आहेत. पंतप्रधान त्या चित्रांकडे लक्षपूर्वक पाहत आहेत. पंतप्रधानांचे हे छायाचित्र शेअर करताना काँग्रेसने लिहिले – ‘मेरी दुनिया’. या फोटोवर भाजपनेही प्रत्युत्तर दिले आहे.
कुरुलकरांवर SIT स्थापन करा इथं का करता; त्र्यंबकेश्वर प्रवेशावरुन राऊतांनी सुनावले
मेरी दुनिया pic.twitter.com/Eyi8n950K4
— Congress (@INCIndia) May 16, 2023
कर्नाटकात भाजपचा दारूण पराभव झाल्यानंतर काँग्रेसमध्ये उत्साह आहे. हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यापासून गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील संबंधांवर टीका करत आहे. पंतप्रधानांनी अदानी समूहाला व्यवसाय वाढवण्यासाठी मदत केल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी उघडपणे करत आहेत.
इनकी दुनिया… https://t.co/jTjSIFAuEU pic.twitter.com/6ocAp1oggd
— BJP (@BJP4India) May 16, 2023
आज सकाळी काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून पंतप्रधानांवर आणखी फोटो शेअर करत हल्ला चढवला आला. पुन्हा एकदा अदानींचे फोटो पाहताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो शेअर करण्यात आला आहे. त्याला काँग्रेसने ‘वाह… काय सीन’ असे कॅप्शन दिले होते.
'वाह… क्या सीन है' pic.twitter.com/V0aYHSUuT8
— Congress (@INCIndia) May 17, 2023