.. तर मोदींचीही खासदारकी होईल रद्द, मोदींची पदवी बनावट; ‘आप’ नेत्याचा गंभीर आरोप

.. तर मोदींचीही खासदारकी होईल रद्द, मोदींची पदवी बनावट; ‘आप’ नेत्याचा गंभीर आरोप

Sanjay Singh : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या पदवीविषयी माहिती देण्याचा आदेश केंद्रीय माहिती आयोगाने गुजरात विद्यापीठाला दिलेला आदेश गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळला. या खटल्याच्या कामकाजासाठी आलेल्या खर्चापोटी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 25 हजार रुपयांच दंडही न्यायालयाने ठोठावला. या निर्णयानंतर आम आदमी पार्टीची नाचक्की झाली असून पार्टीचे नेते भाजपविरोधात चवताळून उठले आहे.

आप नेते खासदार सजय सिंह (Sanjay Singh) यांनी पत्रकार परिषद घेत भाजप (BJP) आणि पंतप्रधान मोदींवर (PM Narendra Modi) तुफान हल्ला चढविला. याबाबत आपने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

https://twitter.com/AamAadmiParty/status/1642441640999542784?s=20

यामध्ये खासदार सिंह यांनी प्रधानमंत्री मोदी यांच्या शैक्षणिक पदवीसंदर्भात गंभीर आरोप केले आहेत. सिंह म्हणाले, ‘प्रधानमंत्री मोदींच्या पदवीचा मुद्दा जसा समोर आला आहे तसा भाजप चवताळून उठला आहे. सगळे मंत्री, नेते आणि प्रवक्ते प्रधानमंत्री मोदींची बनावट पदवी खरी असल्याचे सिद्ध करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत.’

‘पण, मी या पदवीला बनावट का म्हणत आहे ? त्याचे कारण म्हणजे प्रधानमंत्र्यांनी जी डिग्री सार्वजनिक केली आहे. प्रधानमंत्र्यांची जी पदवी गृहमंत्री अमित शहांकडून पत्रकार परिषदेत दाखविली गेली आहे. त्या पदवीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. निवडणूक आयोगाचा नियम हे सांगतो की, जर तुम्ही तुमच्या संपत्तीबाबत काही चुकीची माहिती दिली, तुमच्या शैक्षणिक पदवीबाबत चुकीची माहिती दिली तर सदस्यता रद्द होऊ शकते.’

नामिबियातून आणलेला चित्ता गावात घुसला, गावकऱ्यांमध्ये दहशत

‘जर भारताच्या पंतप्रधानांची पदवी तपासली आणि जर ती बनावट निघाली तर मोदी यांची सदस्यता पूर्णपणे रद्द होऊ शकते. असे झाले तर ते ना खासदार राहतील ना निवडणूक लढण्यास पात्र ठरतील. हा भारताच्या प्रधानमंत्र्याची पदवी बनावट आहे’, असा खळबळजनक आरोप आम आदमी पार्टीचे राज्यसभेचे खासदार संजय सिंह यांनी केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube