INDIA Meeting : निवडणुक निकालांचा कॉंग्रेसने घेतला धसका, खर्गेंनी बोलावली इंडिया आघाडीची बैठक

  • Written By: Published:
INDIA Meeting : निवडणुक निकालांचा कॉंग्रेसने घेतला धसका, खर्गेंनी बोलावली इंडिया आघाडीची बैठक

INDIA allince : मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान विधानसभा (Election Result 2023) निवडणुकीत भाजपे कॉंग्रेसचा सुफडा साफ केला. तेलंगणा वगळता तीनही राज्यात भाजपने कॉंग्रेसला पराभवाची धुळ चाररली. याचाच धसका आता विरोधकांच्या इंडिया आघाडीने (INDIA allince) घेतला आहे. त्यामुळेच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge ) यांनी 6 डिसेंबर रोजी दिल्लीत विरोधी आघाडी इंडियाची बैठक बोलावली आहे.

नाशिकमध्ये विश्वंभर चौधरींवर हल्ला; भर कार्यक्रमात व्यासपीठावरच घडला प्रकार 

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे इंडिया आघाडीचे काम जवळपास ठप्प झाले होते. याचे मुख्य कारण म्हणजे इंडियातील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसचा निवडणुकांवर असलेला फोकस. त्यावरून बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीही जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे इंडिया आघाडीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, आता विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. आणि हे निकाल काँग्रेसला धक्का देणार आहे. त्यामुळं विरोधकांचे धाबे दणाणले आहेत.

BRS कडून फक्त जाहिरातीत गुलाबी चित्र, वास्तव समजल्याने जनतेने…; अशोक चव्हाणांचे टीकास्त्र 

दिल्लीत बैठक बोलावली

विधानसभा निवडणुकीचे निकाल हे इंडिया विरोधी पक्षांच्या राष्ट्रव्यापी आघाडीला इशारा देणार आणि जागे करणारे ठरले आहेत. भाजपशी प्रभावीपणे लढायचे असेल तर एकदिलाने लढावे लागेल, असा स्पष्ट संदेश या निकालांनी दिला आहे.
त्या इशाऱ्याने सावध होत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला बैठकीसाठी बोलावले आहे. 6 डिसेंबरला दिल्लीत विरोधी पक्षांचा बैठक होणार आहे. खर्गे यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे.

जागावाटपा बाबत चर्चा होऊ शकते

या बैठकीत पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जागावाटपावर चर्चा होण्याची शक्यता आहे .खरे तर सार्वत्रिक निवडणुकीसाठी आघाडीची रणनीती आणि जागावाटप निश्चित करण्यासाठी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा निवडणुकांच्या निकालाची प्रतिक्षा होती. आता निकाल समोर आले असून आघाडीतील पक्षांमधील जागावाटपाच्या चर्चेला वेग येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि समाजवादी पार्टी या पक्षांना जागावाटप लवकरात लवकर निश्चित व्हावे अशी इच्छा होती, परंतु विधानसभा निवडणुकीमुळे या संदर्भातील चर्चा पुढे ढकलण्यात आली होती.

रॅली काढण्यात येणार

लोकसभा निवडणुकीत भाजपशी टक्कर देण्यासाठी 26 पक्षांनी I.N.D.I.A. या नावाने युती केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या संयुक्त रॅलीची योजना आता विरोधी पक्षनेते आखणार आहेत.

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube