BJP : देशातील आणखी 6 राज्ये भाजपाच्या रडारवर; लवकरच घेणार ‘हा’ निर्णय
BJP News : भाजपने मंगळवारी पंजाब, तेलंगाणा, झारखंडसह चार राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलले. लोकसभा निवडणुकांआधी संघटनेत केलेले हे बदल राज्यनिहाय रणनितीचे संकेत आहेत. यानंतर आता भाजप (BJP) आणखी सहा राज्यांतील प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या तयारीत आहे. येत्या एक ते दोन दिवसांत याबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती आहे.
आता ज्या राज्यातील प्रदेशाध्यक्ष बदलले जाणार आहेत. त्यामध्ये मध्यप्रदेश, गुजरात, हरियाणा, जम्मू काश्मिर, कर्नाटक आणि केरळ या राज्यांचा समावेश आहे. पद सोडणाऱ्या अनेक अध्यक्षांना मोदी मंत्रिमंडळात एन्ट्री मिळण्याचीही शक्यता असल्याची माहिती आहे.
चंद्रशेखर आझाद रावण गोळीबार प्रकरणाचं हरियाणा कनेक्शन; चार जणांना उचललं…
गुजरात प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे. पाटील लोकसभेचे खासदारही आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात घेणेही सोपे राहिल. पाटील यांनी 2014 च्या निवडणुकीत नवसारी मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत त्यांनी तब्बल 6 लाख मतांच्या फरकाने काँग्रेस उमेदवाराचा पराभव केला होता. आता अशीही माहिती मिळत आहे की त्यांना मंत्रीपदाऐवजी संघटनेतच महत्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते. पाटील हे पंतप्रधान मोदी यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात.
पाटील यांच्या व्यतिरिक्त मध्य प्रदेशचे अध्यक्ष व्ही. डी. शर्मा केंद्रीय मंत्री बनू शकतात. शर्मा यांना दिल्लीत नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र त्यांच्या जागी कोण हा प्रश्न कायम आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांची घोषणा करण्यात विलंब होत आहे. त्यांच्या जागी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, प्रल्हाद पटेल, कैलाश विजयवर्गीय, सुमेर सिंह सोलंकी यांची नावे चर्चेत आहेत.
महागाईचा भडका! टोमॅटो, तूर दाळींचे दर वाढले, स्वस्त कर्जाचं स्वप्नही भंगले
पक्षातील बदलांसह मोदी कॅबिनेटमध्येही बदलांच्या चर्चा जोरात सुरू आहेत. भाजप नेते जी. किशन रेड्डी यांना तेलंगाणा अध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहे. रेड्डी हे आतापर्यंत पर्यटन मंत्री म्हणून काम पाहत होते. त्यांच्या जागी नव्या चेहऱ्याला संधी दिली जाऊ शकते.