Rahul Gandhi : दिल्ली पोलीस राहुल गांंधींच्या घरी.. भारत जोडो यात्रेशी संबंध

Rahul Gandhi : दिल्ली पोलीस राहुल गांंधींच्या घरी.. भारत जोडो यात्रेशी संबंध

Rahul Gandhi :  काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठात केलेल्या वक्तव्यानंतर भाजप त्यांच्याविरोधात अधिकच आक्रमक झाला आहे. आधी राहुल गांधींनी माफी मागावी यासाठी संसदेत गदारोळाचे प्रकरण ताजे असतानाच आता राहुल गांधी यांच्या दिल्लीतील घरी दिल्ली पोलीस येऊन धडकल्याची माहिती मिळाली आहे.

भारत जोडो यात्रेदरम्यान त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे बोलले जात आहे. या वक्तव्याप्रकरणी त्यांना दिल्ली पोलिसांनी नोटीस धाडली होती. मात्र,  राहुल गांधी यांनी या नोटीशीला उत्तर दिले नाही. त्यामुळे आज सकाळी दिल्ली पोलिसांचे पथक त्यांच्या  घरी पोहोचले.  पोलिसांच्या या कारवाईने देशातील राजकारणात मात्र खळबळ उडाली आहे.

वाचा : Rahul Gandhi : राहुल गांधी यांची खासदारकी धोक्यात?

राहुल गांधी यांनी म्हटले होते, की महिलांचे आजही शोषण होत आहे. भारत जोडो यात्रेत अशा अनेक महिला आपल्याला भेटल्या. श्रीनगर येथे भारत जोडो यात्रेच्या शेवटच्या दिवशी त्यांनी हे वक्तव्य केले होते. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी  त्यांना नोटीस पाठवत अशा महिलांची माहिती देण्यास सांगितले होते. मात्र, राहुल गांधी यांनी या नोटीसीला कोणतेच उत्तर दिले नाही.

या कारवाईच्या अनुषंगाने दिल्ली पोलिसांशी संपर्क साधला असता विशेष पोलीस आयुक्त सागर प्रीत हुड्डा म्हणाले, की आम्ही येथे राहुल गांधी यांच्याशी बोलण्यासाठी आलो आहोत. त्यांनी श्रीनगरमध्ये जे वक्तव्य केले होते की भेटीदरम्यान ते अनेक महिलांना भेटले. आणि या महिलांनी अत्याचार झाल्याचे सांगितले होते. त्यानंतर अशा पिडीतांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही त्यांना माहिती गोळा करण्यासाठी येथे आलो आहोत. पोलिसांनी याआधी 15 मार्च रोजी माहिती घेण्याचा प्रयत्न केला होता पण ते शक्य झाले नाही. त्यानंतर  आम्ही 16 मार्चला नोटीस पाठवली होती.

Rahul Gandhi यांचा नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप : भारतात लोकशाही संकटात!

या प्रकरणात पथकाने तपास केला खरा मात्र अशी कोणतीही महिला आढळून आली नाही. आम्ही याआधीही याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र, राहुल गांधी विदेशात असल्याने ते शक्य झाले नाही, असे हुड्डा यांनी सांगितले.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube