Earthquake : जोरदार धक्क्याने घरे हादरली! हिमाचल प्रदेशात भूकंपाने नागरिक भयभीत

Earthquake : जोरदार धक्क्याने घरे हादरली! हिमाचल प्रदेशात भूकंपाने नागरिक भयभीत

Earthquake in Himachal Pradesh : सध्या भूकंप होण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील आठवड्यात राजधानी दिल्लीसह अफगाणिस्तान, पाकिस्तान, चीन देशांनाही भूकंपाचा धक्का बसला होता. आता पुन्हा हिमाचल प्रदेशातील लाहौल स्पीती जिल्ह्यात बुधवारी रात्री उशिरा भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 3.4 मोजली. हा भूकंपही जोरदार होता. अचानक घरे हादरू लागल्यानंतर लोक घाबरले आणि घराबाहेर पडू लागले. काल रात्री 11 वाजून 20 मिनिटांनी हा भूकंप झाल्याचे सांगण्यात येत आहे.

उत्तर भारतात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. उत्तराखंड, बिहार, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश या राज्यांत पावसाने थैमान घातले आहे. नद्यांना पूर आला आहे. घाटात दरड कोसळण्याचे प्रमाणही वाढले आहे. लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. भूस्खलनाच्याही घटना घडत आहेत. सिरमौरमध्ये काल झालेल्या ढगफुटीमुळे गिरी नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली.

दरम्यान, याआधी 5 ऑगस्ट रोजी दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 5.8 इतकी होती. रात्री उशिरा 9.34 मिनिटांनी हे धक्के जाणवले. जम्मू-काश्मीरमधील गुलमर्ग येथे भूकंपाचा केंद्रबिंदू होता. भूकंपाचे धक्के केवळ दिल्ली-एनसीआरमध्येच नव्हे तर आसपासच्या भागातही जाणवले. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील लाहोर, पेशावर भागात भूकंप झाला आहे. या भूकंपात कोणतीही जीवित आणि वित्त हानी झाली नाही.

दिल्लीत मोठ्या भूकंपाचा धोका का?

दिल्लीत मोठा भूकंप होण्याची शक्यता बऱ्याच दिवसांपासून वर्तवली जात आहे. राजधानीत मोठ्या तीव्रतेचा भूकंप होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. वास्तविक दिल्ली हे भूकंपाच्या झोनपैकी झोन ​​4 मध्ये आहे. देश अशा चार झोनमध्ये विभागलेला आहे. झोन-4 मध्ये असल्याने दिल्ली भूकंपाचे जोरदार धक्केही सहन करू शकत नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube