‘मन की बात’मधून मोदींनी दिले नव्या संकटाचे संकेत; म्हणाले, लोकांनो सतर्क राहा..
99th Mann Ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी रविवारी त्यांच्या 99 व्या ‘मन की बात’ (99th Mann Ki Baat) कार्यक्रमातून पुन्हा एकदा देशवासियांना संदेश दिला. पंतप्रधान मोदींनी अवयवदान आणि स्वच्छ ऊर्जेचे महत्त्व सांगण्यासोबतच लोकांना कोरोना विषाणूबाबत सतर्क केले. ‘मन की बात’ च्या 99 व्या भागात मोदींनी देशवासियांना संबोधित करताना देशातील वाढत्या कोविड प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर लोकांना सावध राहण्याचा इशारा दिला. पीएम मोदी म्हणाले, ‘सण साजरे करा, पण नेहमी सतर्क राहा.’
मोदी म्हणाले, काही ठिकाणी कोरोना वाढत आहे. म्हणूनच तुम्ही सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे. स्वच्छतेचीही काळजी घेतली पाहिजे. एक महिन्यापूर्वी जिथे देशभरात कोविड-19 संसर्गाच्या नवीन रुग्णांची संख्या 100 च्या आत होती, तिथे आता एकापेक्षा जास्त आणि दररोज दीड हजार नवीन रुग्णांची नोंद होत आहे.
Dada Bhuse : आम्ही सभा घ्यायचो तेव्हा थेट माईक हातात घ्यायचे अन् आता…
रविवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अपडेटमध्ये असे सांगण्यात आले की, ‘भारतात कोरोना विषाणूचे 1890 नवीन रुग्ण आढळले आहेत, जे 149 दिवसांतील सर्वाधिक आहे. त्यानंतर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 9433 वर पोहोचली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये देशात एकाच दिवसात 2208 रुग्ण आढळले होते.
मोदी म्हणाले, अवयवदान करा
पंतप्रधान मोदींनी मन की बात कार्यक्रमात अवयवदानाचे महत्त्व अधोरेखित केले. पंतप्रधान मोदी यांनी रविवारी सांगितले की, आज देशात अवयवदानाविषयी जागरूकता वाढत आहे आणि गेल्या 10 वर्षांत अवयवदान करणाऱ्यांची संख्या तीन पटीने वाढली आहे. यावेळी पंतप्रधानांनी लोकांना रक्तदानासाठी जास्तीत जास्त संख्येने पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
काही अवयवदान करणाऱ्यांच्या नातेवाइकांचे अनुभव ऐकून पंतप्रधान म्हणाले, “तुमचा एक निर्णय अनेकांचे जीव वाचवू शकतो, जीवन घडवू शकतो.” अवयवदानाची वाट पाहणाऱ्यांना हे माहीत आहे की, प्रत्येक क्षण पार करणे किती कठीण असते. एकच क्षण आणि अशा स्थितीत जेव्हा कोणी अवयव किंवा देहदान करणारा सापडतो, तेव्हा त्याच्यामध्ये फक्त देवाचे रूप दिसते.
आधुनिक वैद्यक शास्त्राच्या युगात अवयवदान हे एखाद्याला जीवन देण्याचे अत्यंत महत्त्वाचे साधन बनले आहे कारण, जेव्हा एखादी व्यक्ती मृत्यूनंतर त्याचे शरीर दान करते तेव्हा 8 ते 9 जणांना नवीन जीवन मिळण्याची शक्यता असते. ते म्हणाले, ‘आज आपल्या देशात मोठ्या संख्येने गरजू लोक आहेत जे निरोगी आयुष्याच्या आशेने अवयवदात्याची वाट पाहत आहेत.’