‘NTA’कडून नीट परीक्षेचा निकाल जाहीर; देशभरात झालेल्या गोंधळानतर झाली होती पुनर्परीक्षा

‘NTA’कडून नीट परीक्षेचा निकाल जाहीर; देशभरात झालेल्या गोंधळानतर झाली होती पुनर्परीक्षा

NEET UG 2024 Re-exam Result : नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून आज नीट परीक्षेचा NEET UG 2024)च्या पुर्नपरीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. (https://exams.nta.ac.in/NEET/) या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. 1563 विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा पुन्हा आयोजित करण्यात आली होती. ग्रेस मार्क्स देण्यावरून झालेल्या वादानंतर या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय झाला होता. (NEET UG 2024) त्यानंतर निकालाला आव्हान देत कोर्टात प्रकरण पोहचल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ग्रेस मार्क्स सोडून मार्क्स स्वीकारा अन्यथा पुन्हा परीक्षा द्या असा पर्याय दिला होता. (NEET ) त्यानंतर पात्र विद्यार्थ्यांमधून 813 जणांनी पुन्हा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. ही परीक्षा 23 जून दिवशी घेण्यात आली होती.

व्यावसायिक सिलिंडर वापरणाऱ्यांना दिलासा; आजपासून किमतीत कपात, किती कमी झाली किंमत?

NEET UG 2024 चे समुपदेशन 6 जुलैपासून सुरू होणार आहे. पात्र उमेदवारांनी समुपदेशन प्रक्रियेसाठी स्वतःची नोंदणी करणं आवश्यक आहे. आकडेवारीनुसार, 5 मे रोजी झालेल्या NEET UG 2024 परीक्षेत 9,96,393 पुरुष उमेदवार, 13,31,321 महिला उमेदवार आणि 17 ट्रान्सजेंडर उमेदवारांनी सहभाग घेतला होता, ज्यांची एकूण उपस्थिती 96.94 टक्के होती.

NEET-UG म्हणजे काय?

NEET-UG म्हणजेच राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा-अंडर ग्रॅज्युएट. दरवर्षी, नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेते. भारत सरकारच्या म्हणण्यानुसार, भारत आणि परदेशातील वैद्यकीय संबंधित अभ्यासक्रमांचा अभ्यास करण्यासाठी NEET परीक्षा उत्तीर्ण होणं अनिवार्य आहे. भारतातील 542 वैद्यकीय, 313 दंत, 914 आयुष आणि 47 BVSc आणि AH महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी दरवर्षी NEET-UG आयोजित केले जाते.

NEET च्या निकालावर प्रश्नचिन्ह का? लोकसभा उपाध्यक्ष पदासाठी विरोधकांची मोठी खेळी, अयोध्येचा खासदार भाजपचा खेळ बिघडवणार?

NTA ने 4 जून रोजी NEET-UG 2024 चा निकाल जाहीर केला तेव्हा याची सर्वत्र चर्चा सुरू झाली. कारण या परीक्षेत एकूण 67 उमेदवारांनी 720 पैकी 720 गुण मिळवले होते आणि सर्वांना टॉपर घोषित करण्यात आलं होतं. एकाच वेळी 67 उमेदवार टॉपर्स ठरल्यानंतर परीक्षेवर प्रश्न उपस्थित केलं गेलं. कारण 2019 पासून, NEET UG च्या परीक्षेत तीनपेक्षा जास्त टॉपर्स झालेले नव्हते. यात विशेष बाब म्हणजे या 67 टॉपर्सपैकी 44 ग्रेस मार्क्ससह टॉपर ठरले. तर 8 टॉपर्स एकाच परीक्षा केंद्रावरील होते.

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या

वेब स्टोरीज