“PM पदाचा चेहरा नसले तर काही फरक पडत नाही”: खर्गेंच्या उमेदवारीला पवारांचा खो?

“PM पदाचा चेहरा नसले तर काही फरक पडत नाही”: खर्गेंच्या उमेदवारीला पवारांचा खो?

मुंबई :१९७७ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचा चेहरा घोषित केला नव्हता, मतदानानंतर मोराराजी देसाई पंतप्रधान झाले. त्यामुळे पंतप्रधानपदाचा चेहरा नसले तर काही फरक पडत नाही. जर लोक बदलाच्या मूडमध्ये असतील, तर ते बदल घडवून आणण्यासाठी स्वतःता निर्णय घेतात, असे म्हणत पंतप्रधानपदाच्या चेहऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाष्य केले. (Nationalist Congress Party supremo Sharad Pawar has said no prime ministerial face was projected during the 1977 Lok Sabha polls)

आगामी 2024 च्या निवडणुकांसाठी विरोधी इंडिया आघाडीने अद्याप पंतप्रधानपदाचा चेहरा घोषित केलेला नाही. मात्र इंडिया आघाडीतील काही पक्षांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांना पंतप्रधानपदासाठी विरोधी आघाडीचे उमेदवार म्हणून प्रस्तावित केले आहे. त्याचवेळी शरद पवार यांच्या या भूमिकेमुळे त्यांचा खर्गेंना पाठिंबा नाही का? असा सवाल विचारला जात आहे.

“PM पदाचा चेहरा नसले तर काही फरक पडत नाही”: खर्गेंच्या उमेदवारीला पवारांचा खो?

खर्गेंना पंतप्रधान पदाचा चेहरा घोषित करण्यासाठी प्रस्ताव :

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना ‘इंडिया’ (India) आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा बनवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावाला शिवसेना (UBT), आम आदमी पक्षासह 12 पक्षांनी पाठिंबा दिला आहे. हा प्रस्ताव अद्याप मंजूर झाला नसला तरी याच नावावर एकमत होण्याची शक्यता आहे.

ठाकरेंनी बजावली महत्वाची भूमिका :

ज्या 12 पक्षांनी खर्गे यांच्या नावाला पसंती दर्शविली त्यात शिवसेना (UBT) चाही समावेश आहे. इतकचे नाही तर या नावाची निवड करण्यामागे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महत्वाची भूमिका बजावल्याचे बोलले जात आहे. गत आठवड्ययात बैठकीसाठी दिल्लीत आलेल्या उद्धव ठाकरे यांनी सर्वप्रथम अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. त्यानंतर ममता बॅनर्जींनी केजरीवाल यांची भेट घेऊन बराच वेळ चर्चा केली. दोघांची ही भेट म्हणजे शिष्टाचाराची भेट असल्याचे सांगितले जात होते.

Manoj Jarange : आम्ही सज्ज, तयारीही पूर्ण; जरांगेंनी सांगितलं मुंबईतील उपोषणाचं प्लॅनिंग

पण याच तीन भेटींनंतर मंगळवारी ममता बॅनर्जी यांनी बैठकीत पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून खर्गे यांचे नाव सुचविले. त्यावेळी शिवसेना (UBT), आपसहित 12 प्रमुख पक्षांनी लगेचच या प्रस्तावाला पाठिंबा दिला. मात्र आता शरद पवार यांनी पंतप्रधानपदाचा चेहरा नसले तर काही फरक पडत नाही. असे म्हणत खर्गे यांना पंतप्रधानपदाचा चेहरा घोषित करण्याच्या प्रस्तावाला एकप्रकारे खो दिला असल्याचेच बोलले जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube