Neet Paper Leak : कॉंग्रेसच्या पवित्र्यात मोठा बदल..’आधी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मग चर्चा’, सत्ताधाऱ्यांची नस पकडली!

आधी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मगच चर्चा करणार असल्याचा पवित्रा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गेंनी घेतला आहे.

Untitle (3)

Neet Paper Leak : नीट पेपर लिकच्या (Neet Paper Leak) मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी विरोधकांनी दोन दिवसांपासून संसदेत गदारोळ केल्यानंतर आता कॉंग्रेसने आपल्या पवित्र्यात मोठा बदल केल्याचं दिसून येत आहे. कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी आता केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, मगच संसदेत चर्चा करणार असल्याचा पवित्रा घेतला आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात नीटच्या मुद्द्यावर विरोधकांनी नस पकडल्याचं दिसून येत आहे.

नीट पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर हजारो विद्यार्थी आंदोलन करत आहे. तर दुसरीकडे लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन करत मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याचबरोबर राहुल गांधी यांनी देखील पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

जंतरमंतरवरील आंदोलकांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन, काय झाली चर्चा?

जंतर मंतरवर 20 जुलै रोजी विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर दिल्लीतील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. या घटनेच्या निषेधार्थ आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील अधिकृत निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले.

या संपूर्ण घडगामोडींवर केंद्रीय मंत्री प्रधान म्हणाले की, सरकारची सर्वसमावेशक चर्चा करण्याची इच्छा असूनही काँग्रेसने लोकशाही चर्चेऐवजी राजकीय तमाशा निवडला. विद्यार्थ्यांच्या समस्यांवर तोडगा काढणे हे त्यांचे ध्येय नसून राजकीय लक्ष वेधण्यासाठी अशांतता निर्माण करणे हे मुख्यम ध्येय आहे. राहुल गांधीसाठी हा विद्यार्थ्यांचा प्रश्न नाही तर चर्चेचे सर्व संभाव्य मार्ग खुले झाल्यानंतर संघर्ष निर्माण करण्याचा हा मुद्दा आहे. नीट परीक्षेबाबत चर्चा करण्यास आणि तरुणांच्या प्रत्येक रास्त शंकेचे निरसन संसदेच्या सभागृहात करण्यास आमचे सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे.

“मन की बात” नव्हे, “जन की बात” ऐका; सरकारपेक्षा इंग्रज बरे होते म्हणण्याची वेळ आली – उद्धव ठाकरे

दरम्यान, नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या या आंदोलनाने आता व्यापक राजकीय स्वरूप धारण केले आहे. आंदोलकांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. सरकारने विद्यार्थ्यांवरील कारवाईची न्यायालयीन चौकशी करावी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशीही आंदोलकांची भूमिका आहे.

follow us