मोदी सरकारनं बोलावलं, 17 पक्षांनी ऐकलं; संसद भवनाच्या उद्घाटनाला हजर राहणार

मोदी सरकारनं बोलावलं, 17 पक्षांनी ऐकलं; संसद भवनाच्या उद्घाटनाला हजर राहणार

New Parliament Building Inauguration : देशाला नवीन संसद भवन (New Parliament Building) मिळणार आहे. येत्या 28 तारखेला पंतप्रधान मोदी संसदेच्या इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. मात्र, मोदी (PM Narendra Modi) यांनी उद्घाटन करण्यावरुनच सगळा वाद पेटला आहे. काँग्रेससह वीस पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे तर जवळपास 17 पक्षांनी मोदी सरकारचे आमंत्रण स्वीकारलं आहे.

विरोधकांचे म्हणणे आहे की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना डावलून पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटनाचा निर्णय म्हणजे लोकतंत्रावर सरळ हल्ला आहे. बुधवारी विरोध पक्षांनी एक संयुक्त निवेदनही प्रसिद्ध केले. या निवेदनात म्हटले होते की सरकारने संसदेतून लोकशाहीच आत्माच काढून टाकला आहे. त्यामुळे या संसद भवनाला काहीच अर्थ राहत नाही.

संसद भवनाचा वाद पेटला! राष्ट्रपतींचे नाव घेत विरोधकांचा कार्यक्रमावरच बहिष्कार

मोदी सरकारने दिलेले उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण 17 पक्षांनी स्वीकारले आहे. यामध्ये भाजपा, शिवसेना (शिंदे गट), शिरोमणी अकाली दल, एनपीपी, एनडीपीपी, एसकेएम, जेजेपी, आरएलजेपी, आरपीआय (आठवले गट), अपना दल (एस), तमिळ मनीला काँग्रेस, एआयएडीएके, बीजेडी, तेलुगु देसम पार्टी, वायएसआर काँग्रेस, आयएमकेएमके आणि एजेएसयू एमएनएफ या पक्षांचा समावेश आहे.

तर या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणाऱ्या पक्षांमध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, डीएमके, आम आदमी पार्टी, शिवसेना (उबाठा), समाजवादी पार्टी, सीपीआय, जेएमएम, केरळ काँग्रेस (मणि), वीसीके, रालोद, राष्ट्रवादी काँग्रेस, जेडीयू, सीपीआय (एम), आययूएमएल, नॅशनल कॉन्फ्रेंस, आरएसपी, एआयएमआयएम आणि एमडीएमके या पक्षांचा सहभाग आहे. याबाबत दैनिक भास्करने वृत्त दिले आहे.

28 तारखेचा योगायोग की मास्टस्ट्रोक

तसे पाहिले तर भाजप (BJP) सावरकरांना नेहमीच एक नायकाच्या रुपात मानत आला आहे. याचे कारण म्हणजे भाजपच्या राष्ट्रवादासह हिंदुत्वाला सोबत घेत राजकारणात आपली पकड घट्ट करत आहे. अशा वेळी सावरकर भाजपला जास्त फायदेशीर ठरतात. भाजपाच्या काही नेत्यांनी तर सावरकरांना भारतरत्न देण्याचीही मागणी केली आहे. सावरकरांच्या जयंती दिनीच संसद भवनाचे उद्घाटन करून भाजप सावरकरांना पुन्हा चर्चेत आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे बोलले जात आहे. या रणनितीला राहुल गांधी आणि काँग्रेसला (Congress) सणसणीत उत्तराच्या रुपातही पाहिले जात आहे.

New Parliament Inauguration: ऑस्ट्रेलियाहून परतताच पंतप्रधानांचा विरोधकांना एकजुटीचा मंत्र

दरम्यान, संसद भवन अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहे. येथे अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube