News click Funding : संसदेत येताचं राहुल गांधींवर भाजपचा हल्लाबोल; कॉंग्रेसला चीनकडून फंडिंगचा आरोप

News click Funding : संसदेत येताचं राहुल गांधींवर भाजपचा हल्लाबोल;  कॉंग्रेसला चीनकडून फंडिंगचा आरोप

News click China Funding : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी बहाल करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यामुळे आता पावसाळी अधिवेशनातच राहुल गांधी लोकसभेत दिसले आहेत. मोदी आडनाव प्रकरणात राहुल गांधींची खासदरकी रद्द करण्यात आली होती. त्यानंतर लगेचच भाजपने त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. (News click China Funding Rahul Gandhi and Congress Criticized by BJP in parliament )

Vijay Raghavendra wife: साऊथच्या सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन!

राहुल गांधी लोकसभेत येताच भाजपने आरोप केले की, कॉंग्रेस पक्ष एका न्यूज पोर्टलसोबत देशविरोधी अभियान चालवत आहे. या न्यूज पोर्टलचं नावं न्यूजक्लिक असं आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आरोप करताना म्हटलं की, कॉंग्रेस, चीन आणि न्यूजक्लिक यांचे संबंध आहेत. ते मिळून देशविरोधी अभियान चालवत आहेत.

ब्रिटनमध्ये सापडला कोविडचा आणखी एक व्हेरिएंट, जाणून घ्या लक्षणे

हे आरोप करताना त्यांनी न्यूयॉर्क टाईम्सचा संदर्भ दिला. तर राहुल गांधी यांचं प्रेमाचं दुकान नकली आहे. त्यात चीनी सामान आहे. चीनवरच त्यांचं प्रेम स्पष्ट दिसतं. अशी टीका केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांच्यावर केली. त्याचबरोबर भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी देखील राहुल गांधींवर निशाणा साधला. त्यांनी म्हटलं की, राहुल यांचं द्वेषाचं दुकान चीनी सामानाने भरलेलं आहे. कॉंग्रेला चीनसोबत मिळून भारत तोडायचा आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने कॉंग्रेस पक्षाच्या चीनी फंडिंगची चौकशी करावी.

पुढे ते म्हणाले की, 2021 मध्ये आम्ही न्यूजक्लिकचा चेहरा समोर आणला होता. ते कशा प्रकारे विदेशात भारताचा अपप्रचार करतात. आणि भारत विरोधी आहे. तर त्यांच्या या भारतविरोधी अभियानामध्ये कॉंग्रेस आणि इतर विरोधीपक्ष त्यांचं समर्थन करत आले आहेत. तर चीनी कंपन्या मुगल नेविल रॉय सिंघमच्या माध्यमातून न्यूजक्लिकला फंडिंग करतात. त्यात भारतात त्यांचे काही सेल्समन आहेत. त्यांच्यावर कारवाई होताचं हे पक्ष त्यांच्य समर्थनार्थ उतरले होते. अशी टीका कॉंग्रेसवर करण्यात आली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube