…अन्यथा 10 हजारांपर्यंत दंड! टोल नाका ओलांडताच येणार मेसेज; NHAI ची नवी यंत्रणा

NHAI’s new system सुरू करत आहे. यानुसार, तुम्ही राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाका ओलांडताच काही मिनिटांत तुमच्या मोबाईलवर मेसेज येणार आहे.

NHAI New System

NHAI’s new system message will be sent as soon as you cross toll plaza  : गाडी घेऊन रस्त्यावर निघताना आपण पेट्रोल आहे की नाही, याकडे आवर्जून लक्ष देतो. पण गाडीची कागदपत्रं अपडेट आहेत की नाहीत, याकडे मात्र अनेकदा दुर्लक्ष होतं. विशेषतः वाहनाचा इन्शुरन्स आणि पीयूसी प्रमाणपत्राची मुदत संपली आहे का, हे तपासण्याकडे अनेकजण गांभीर्याने पाहत नाहीत.पण आता हे दुर्लक्ष महागात पडू शकतं. कारण भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच NHAI एक नवी हायटेक यंत्रणा सुरू करत आहे. या व्यवस्थेनुसार, तुम्ही राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाका ओलांडताच काही मिनिटांत तुमच्या मोबाईलवर मेसेज येणार आहे.

ठाणे पोलीस आयुक्तांचेच व्हॉट्सॲप हॅक; स्टेटसवर 20 अश्लील व्हिडीओ, पोलीस दलात खळबळ

या यंत्रणेत वाहनाचा नंबर स्कॅन करून त्याची माहिती थेट सरकारी डेटाबेसमधून तपासली जाणार आहे. वाहनाचा इन्शुरन्स संपलेला असेल किंवा वैध नसेल, तर वाहनमालकाला तातडीने SMS पाठवला जाईल. त्यानंतर नियमांनुसार दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू होऊ शकते. दिल्लीतील UER-II महामार्गावरील मुंडका टोल नाक्यावर सध्या या यंत्रणेची प्रायोगिक चाचणी सुरू आहे.

टोल नाका ओलांडताच मोबाईलवर येणार SMS

नव्या व्यवस्थेनुसार, राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाका पार केल्यानंतर काही मिनिटांतच वाहनमालकाला SMS अलर्ट मिळणार आहे. NHAI ने दिल्लीतील मुंडका टोल नाक्यावर या पायलट प्रोजेक्टची सुरुवात केली आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर ही यंत्रणा देशभरात लागू करण्याची तयारी आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, वाहनमालकांनी वेळेत आपल्या वाहनाचा इन्शुरन्स रिन्यू करावा, यासाठी ही व्यवस्था तयार करण्यात आली आहे. एखादं वाहन टोल नाक्यावरून गेल्यानंतर त्याची माहिती NIC म्हणजेच नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरच्या वाहन डेटाबेसशी जोडली जाईल. त्यानंतर ऑटोमेटेड सिस्टिमच्या मदतीने वाहनाच्या इन्शुरन्सची वैधता तपासली जाईल.

भारताची पहिली बर्ड फ्लू व्हॅक्सिन तयार, अंडी-चिकन स्वस्त होणार? वाचा डिटेल्स

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, वाहनाचा इन्शुरन्स संपलेला असेल किंवा वाहनाचा विमाच नसेल, तर संबंधित मालकाला SMS पाठवला जाईल. या मेसेजमध्ये वाहनाचा रजिस्ट्रेशन नंबर, टोल नाका ओलांडल्याची वेळ आणि इन्शुरन्सची मुदत संपल्याची माहिती दिली जाईल. तसंच, इन्शुरन्सची मुदत कधी संपली आहे, याचाही उल्लेख मेसेजमध्ये असेल. वाहनमालकाने लवकरात लवकर विम्याचे नूतनीकरण करावे, असा सल्लाही या SMS मधून दिला जाईल. जेणेकरून मोटार वाहन कायद्यानुसार होणारा दंड टाळता येईल.

पहिल्यांदा पकडल्यास 5 हजार, पुन्हा नियम मोडल्यास 10 हजारांचा दंड

वाहनांचा विमा नसणे ही गंभीर बाब मानली जाते. विशेषतः विमा नसलेलं वाहन अपघातात सापडलं, तर अपघातग्रस्तांना नुकसानभरपाई मिळवताना अडचणी येऊ शकतात. त्यामुळे वाहनमालकांनी वेळेत इन्शुरन्स रिन्यू करावा, हा या नव्या यंत्रणेचा मुख्य उद्देश आहे.सध्याच्या कायद्यानुसार, विमा नसलेलं वाहन पहिल्यांदा पकडलं गेल्यास वाहनाच्या बेस प्रीमियमच्या तिप्पट किंवा 5 हजार रुपये, यापैकी जी रक्कम जास्त असेल, तेवढा दंड होऊ शकतो. तर पुन्हा हाच नियम मोडल्यास बेस प्रीमियमच्या पाचपट किंवा 10 हजार रुपये, यापैकी जी रक्कम जास्त असेल, तेवढा दंड भरावा लागू शकतो.

follow us