VIDEO: राष्ट्रगीत सुरू, अधिकारी शांत उभे, नितीश कुमार हसू लागले अन्

Nitish Kumar Strange Gestures national anthem: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) हे गुरुवारी एका सरकारी कार्यक्रमाला हजर होते. या कार्यक्रमात राष्ट्रगीत सुरू झाले. त्यावेळी सर्वजण राष्ट्रगीत म्हणत होते. नितीश कुमार यांच्या बाजूला उभे असलेले अधिकारी हे राष्ट्रगीत म्हणत होते. त्यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार हे अधिकाऱ्याकडे बघून हसू लागले. त्यांच्याकडे बघून काही तरी इशारा करत होते. तसेच लोकांना हातजोडून नमस्कार करत होते. हा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. त्यावरून नितीश कुमार यांना काय झाले होते, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.
गुरुवारी पटणा येथील सेपकटकरा वर्ल्ड कप 2025 चे उद्घाटनला नितीश कुमार हे प्रमुख पाहुणे होते. उद्घाटन सोहळ्याला प्रमुख अधिकारी, मंत्री, स्पर्धेचे आयोजन यांच्यासह खेळाडू उपस्थित होते. या स्पर्धेच्या दरम्यान राष्ट्रगीत सुरू होते. त्यावेळी सीएम नितीश कुमार हे अचानक हसू लागले. व्यासपीठावर नितीश कुमार यांच्या जवळ त्यांचे प्रधान सचिव दीपक कुमार हे उभे होते. ते दीपक कुमार यांच्या खांद्याला लावून त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते. तसेच समोर असलेल्या लोकांना ते हात जोडून नमस्कार करत होते. त्यावेळी दीपक कुमार हे नितीश कुमार यांना काही तरी सांगत होतो. तोपर्यंत नितीश कुमार यांचा व्हिडिओ शूट झाला होता. त्यानंतर हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे.
थोडी लाज असती तर देश सोडून गेले असते… सालियन प्रकरणात रामदास कदमांची उडी ! ठाकरे पित्रा-पुत्राला घेरले
तेजस्वी यादव यांना साधला निशाणा
विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांना त्यानंतर नितीश कुमार यांच्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही. त्यांनी एक्सवर हा व्हिडिओ टाकला. तुम्ही प्रत्येक दिवशी तरुण, विद्यार्थी, महिला आणि वृद्धाचा अपमान करत आहात. कमीत कमी राष्ट्रगीताचा तरी अपमान करू नका, असे तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे. कधी तुम्ही महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीला टाळ्या वाजविता. आता तर राष्ट्रगिताचा अपमान केलाय. तुम्हाला आठवण करून देतो की तुम्ही मोठ्या प्रदेशाचे मुख्यमंत्री आहेत. तुमची मानसिक आणि शारिरीक स्थिती स्थीर नाही. त्यामुळे मुख्यमंत्री पदावर तुम्ही राहणे हे बिहारसाठी चिंताजनक आहे. बिहारचा पुन्हा-पुन्हा अपमान करू नका ? असा टोलाही तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांना लगावला आहे.
नितीश कुमार वादात! राष्ट्रगीत सुरू असतानाच लागले अधिकाऱ्यांशी बोलायला..
–#bihar #biharnews #nitishkumar #jdu #jduunited #nationalanthem #viralvideos #letsuppmarathi pic.twitter.com/EfAS8dWpcu— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) March 20, 2025