मोठी बातमी, विरोधी पक्षनेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट; ज्ञानेश कुमार राजीनामा देणार
Rahul Gandhi : निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी आज विरोध पक्षनेत्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली आहे.
Rahul Gandhi : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी आज विरोध पक्षनेत्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली आहे. या भेटीनंतर लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, राष्ट्रपती मुर्मू यांनी आमच्या चिंतांची दखल घेतली आहे.
राहुल गांधी सभी विपक्ष नेताओं के साथ ज्ञानेश कुमार को बर्खास्त करने की मांग को लेकर राष्ट्रपति भवन जा रहे है 🔥🔥 https://t.co/h18i8tLmk9
— अपूर्व اپوروا Apurva Bhardwaj (@grafidon) October 9, 2026
गेल्या काही दिवसांपासून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षातील खासदार दिल्लीत मोर्चा काढत आहे. तर आज ज्ञानेश कुमार यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी राहुल गांधी यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षातील खासदारांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आहे.
राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यासह विरोधी पक्षांच्या 10 खासदारांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. या भेटीनंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी राहुल गांधी म्हणाले की, व्होट चोरली जात असल्याचा आरोप राष्ट्रपती फेटाळून लावतील, अशी मला अपेक्षा होती. भारतातील निवडणूक प्रक्रिया मुक्त आणि निष्पक्ष आहे, असे त्या म्हणतील असे मला वाटले होते. परंतु, राष्ट्रपती मुर्मू यांनी आमचे म्हणणे मान्य केल्याचे पाहून मला आश्चर्य वाटले. राष्ट्रपती मुर्मू यांनी या प्रकरणात विचार करुन कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी आमचे म्हणणे मान्य केले आणि त्यानंतर आम्हाला सांगितले की, निवडणुकीतील फेरफार किंवा गैरप्रकारांचे पुरावे आम्हाला त्यांना सादर करावे लागतील. त्यावर मी उत्तर दिले की, निवडणुकीतील फेरफारांबाबतचे पुरावे संपूर्ण देशाला माहित आहेत. एकापाठोपाठ एक राज्ये ताब्यात घेतली गेली, 2024 ची निवडणूकही हायजॅक केली गेली, आणि तरीही राष्ट्रपती आमच्याकडून पुराव्यांची अपेक्षा करत आहेत. पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, नेत्यांचे हेच शिष्टमंडळ सोमवारी सर्वोच्च न्यायालयात जाऊन सरन्यायाधीशांना आपले निवेदन सादर करेल.
LIVE: Media Bite | Protest Against Vote Chori | New Delhi https://t.co/eBuo8FLXrw
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 9, 2026
लोकशाहीत चांगल्या नेतृत्वासाठी व्यावहारिक शिक्षण गरजेचे , खासदार डॉ. राधा मोहनदास अग्रवाल-