पाकिस्तानची UNSC मध्ये मोठी चाल, प्रस्तावात TRF च्या नावाला विरोध; पररष्ट्र सचिवांनी केली पोलखोल

Operation Sindoor : पाकिस्तानने काल रात्री भारतातील 15 शहरांवर हल्ला करण्याचा (Operation Sindoor) प्रयत्न केला. या हल्ल्यांना भारताच्या सतर्कतेने हाणून पाडण्यात आले. याच कारवाईत भारताने लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टीमही नष्ट केलं. या मुद्द्यावर आज परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत (India Pakistan War) खुलासा करण्यात आला. या पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती देण्यात आली. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री म्हणाले की पाकिस्तान जागतिक दहशतवादाचं केंद्र झाला आहे. जगाला पाकिस्तानच्या सगळ्या कारवाया माहिती आहेत. जगातील बहुतांश दहशतवादी घटनांत पाकिस्तानचा सहभाग असतो.
पाकिस्तान सातत्याने जगाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या (United Nations) यादीत असलेले अनेक अतिरेकी आजही पाकिस्तानात मुक्तपणे वावरत आहेत असा दावा मिस्त्री यांनी केला. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तान पुरस्कृत टीआरएफ या दहशतवादी संघटनेने घेतली होती. यानंतर भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत याची माहिती दिली होती. परंतु, ज्यावेळी युएनएससीत या मु्द्द्यावर चर्चा सुरू होती तेव्हा पाकिस्तानने टीआरएफचं नाव प्रस्तावात ठेवण्यास विरोध केला होता असे मिस्त्री यांनी स्पष्ट केले.
Video : “पाकिस्तानच्या एअर डिफेन्सला नष्ट केलं, आता सुधरा नाहीतर..” भारताचा पाकला निर्वाणीचा इशारा
दहशतवाद पाकिस्तानी मंत्र्यांनीच मान्य केला
पाकिस्तान आता दहशतवादापासून हात झटकण्याचा प्रयत्न करत आहे. जगातील अनेक दहशतवादी हल्ल्यांत पाकिस्तानचा सहभाग राहिला आहे. पाकिस्तानच्याच संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र मंत्र्यांनी दहशतवाद आणि पाकिस्तानचे संबंध मान्य केले आहेत. पहलगाम हल्ल्याच्या चौकशीची मागणी करुन पाकिस्तानने फक्त दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. पठानकोट, मुंबई हल्ल्यात भारताने पाकिस्तानला पुरावे दिले होते तरी देखील त्यांनी कोणतीच कारवाई केली नाही असे मिस्त्री यांनी सांगितले.
भारताने पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं : कुरेशी
कर्नल सोफिया कुरेशी (Sofiya Qureshi) यांनी सांगितले की आज सकाळी भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान स्थित अनेक ठिकाणांवर हल्ले केले. लाहोरमध्ये एक एअर डिफेन्स सिस्टिमही (Air Defence System) उद्धवस्त करण्यात आली आहे.