Budget Session : अदानी प्रकरणावरून राज्यसभेत जोरदार हंगामा; सभापतींनी घेतला ‘हा’ निर्णय

Budget Session : अदानी प्रकरणावरून राज्यसभेत जोरदार हंगामा; सभापतींनी घेतला ‘हा’ निर्णय

दिल्ली – संसदेच्या अर्थसंकल्पीय आधिवेशनात (Budget Session) सध्या उद्योगपती गौतम अदानींवरून गदारोळ सुरू आहे. विरोधी पक्षांनी या मुद्द्यावर मोदी सरकारची चांगलीच कोंडी केली आहे. या मुद्द्यावर सातत्याने गदारोळ सुरू असून कामकाजात सातत्याने व्यत्यय येत आहे. सोमवारी (दि.१३) सुद्धा राज्यसभेत जोरदार गोंधळ उडाला.

सोमवारची सुरुवात गदारोळात झाली. अदानी (Gautam Adani) प्रकरणावरून राज्यसभेत विरोधकांनी गदारोळ घातला. दरम्यान, मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांच्या भाषणातील काही भाग रेकॉर्डमधून काढून टाकल्याने विरोधी खासदार भडकले आणि सभापतींच्या व्यासपीठासमोर आले. गोंधळ वाढत असल्याचे पाहून राज्यसभेचे कामकाज १३ मार्चपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

राज्यसभेत गोंधळ सुरू असताना खासदार राघव चढ्ढा, संजय सिंह, इम्रान प्रतापगढ़ी, शक्ती सिंह गोहिल, संदीप पाठक वेलमध्ये पोहोचले. यानंतर अध्यक्षांनी सर्व खासदारांना इशारा दिला. मात्र तरीही गोंधळ काही थांबला नाही. गोंधळ वाढत असल्याचे लक्षात येताच कामकाज थेट १३ मार्चपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राहुल गांधींना लोकसभा सचिवालयाच्या नोटीसवर म्हटले आहे की, राहुल गांधी संसदेत जे काही बोलले ते आधीपासून सार्वजनिक डोमेनमध्ये आहे, ते तेच बोलले आहेत जे प्रत्येकजण बोलतो आणि लिहितो. यात असंसदीय काहीही नाही. त्यामुळे तो त्यानुसार नोटीसला उत्तर देईल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube