अचानक PM मोदींनी केली नवीन संसद भवनाची पाहणी

अचानक PM मोदींनी केली नवीन संसद भवनाची पाहणी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) नवीन संसद भवनाची (New Parliament House) आज अचानक पाहणी केली. यावेळी त्यांनी तेथे सुरू असलेल्या विविध कामांची पाहणी करून त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवादही साधला. नवीन संसद भवनाच्या आकस्मिक पाहणीदरम्यान, पंतप्रधान मोदींनी या इमारतीच्या परिसरात एक तासापेक्षा जास्त वेळ घालवला. यावेळी पंतप्रधान मोदींनी संसदेच्या दोन्ही सभागृहांची पाहणी केली तसेच विविध कामांची पाहणी केली. संसदेच्या नवीन इमारतीच्या आकस्मिक पाहणीवेळी पंतप्रधान मोदींसोबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लाही उपस्थित होते.

केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत देशाची राजधानी नवी दिल्लीत नव्या संसद भवनाच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे.
जुनी संसद ही 1927 मध्ये बांधली गेली.त्यामुळं या वास्तूला हेरिटेज दर्जा देण्यात आला. नव्या टेक्नोलॉजिला अनुसरून खासदारांना काही अद्ययावत साधनं देणं गरजेचं आहे. मात्र, सध्याच्या इमातरीत ती देण्यास सरकारला अडचणी येत आहेत. त्यामुळं नवीन संसद भवना उभारण्यात आली. दरम्यान, आज पीएम मोदींनी या संसदेच्या इमारतीला भेट दिली. पीएम मोदींनी घटनास्थळी सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी केली.

पंतप्रधानांच्या अचानक भेटीची छायाचित्रेही समोर आली आहेत. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत बांधण्यात येणारी संसद पूर्णपणे नव्या रुपात दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संसदेची नवीन इमारत अनेक आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. ही नवीन संसद सध्याच्या संसद इमारतीपेक्षा मोठी असून आकर्षक आहे. सध्या ही नवी संसद अनेक बाबतीत आश्चर्यकारक दिसत आहे. या संसदभनवाचे काम टाटा प्रोजक्ट करत असून हे इमारत तब्बल 64 हजार 500 चौरस मीटरमध्ये बांधली गेली आहे. या इमारतीत दृकश्राव्य प्रणाली तसेच डेटा नेटवर्क सुविधेची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. या नवीन संसदेत तब्बल 1 हजार 224 खासदारांची बसण्याची व्यवस्था आहे.

यात लोकसभेत 888 तर राज्यसभेत 384 खासदार बसू शकतात. नवीन इमारतीत मध्यवर्ती हॉल नसणार आहे. महत्वाचं म्हणजे, या नवीन इमारतीत एक सुंदर संविधान कक्षही बांधण्यात आला आहे. ही इमारत ही पूर्णत: भूंकप प्रतिरोधक आहे.

अजित पवार राज्याचे भावी मुख्यमंत्री, नाशिकमध्ये राष्ट्रवादीची बॅनरबाजी

पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन संसद भवनाच्या कामकाजावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. केंद्र सरकारच्या या प्रकल्पात त्यांची विशेष आवड चित्रांमध्ये स्पष्टपणे दिसून येते. ज्यांनी इमारतीचा पाया रचला त्यांच्याकडे पंतप्रधान मोदींनी दुर्लक्ष केले नाही. यावेळी त्यांनी घटनास्थळी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांची प्रकृती जाणून घेतली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube