इंडिया आघाडीत डिलिमिटेशनवरून मोठा भूकंप! लालूंच्या RJD चा धक्कादायक निर्णय, काय घडलं?

Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयकावरून इंडिया आघाडीत फूट पडण्याची चिन्हे; लालूप्रसाद यादव यांच्या RJD ने विधेयकाला जाहीर केला पाठिंबा.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 11 27T161729.252

Delimitation Bill : डिलिमिटेशन अर्थात मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून देशातील राजकीय वातावरण तापले असतानाच इंडिया आघाडीला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Delimitation) विरोधी पक्षांमधील काही घटकांनी या विधेयकाला विरोध दर्शवला आहे, तर काहींनी अटींसह समर्थन देण्याची भूमिका घेतली आहे. मात्र, बिहारमधील लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने (RJD) या विधेयकाला थेट पाठिंबा जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. केंद्र सरकारने विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी दिल्यानंतर संसदेच्या विशेष अधिवेशनात ते मांडण्याची तयारी सुरू केली आहे.

आरजेडीचे खासदार सुरेंद्र प्रसाद यादव यांनी पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका स्पष्ट करताना मतदारसंघ पुनर्रचनेचे समर्थन केले. देशातील वाढती लोकसंख्या, विकासकामांचा विस्तार आणि उपलब्ध संसाधनांवरील वाढता ताण लक्षात घेता मतदारसंघांचे परिसीमन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. लोकसंख्येच्या प्रमाणात लोकप्रतिनिधींचे प्रमाण वाढल्यास नागरिकांच्या समस्या संसदेत अधिक प्रभावीपणे मांडता येतील, असेही यादव यांनी स्पष्ट केले. लोकसभेच्या जागा वाढवण्याच्या निर्णयालाही त्यांनी समर्थन दर्शवले.

देशाच्या राजकारणात मोठी घडामोड! डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

परिसीमनाची प्रक्रिया भविष्यातील लोकसंख्यावाढ आणि विकासाच्या गरजा लक्षात घेऊन आतापासूनच सुरू करणे आवश्यक असल्याचे सुरेंद्र यादव यांनी म्हटले. 2027 मध्ये लोकसंख्यावाढीचे मुद्दे समोर आल्यानंतर अचानक निर्णय घेण्यापेक्षा आधीच तयारी केलेली चांगली, अशी भूमिका त्यांनी मांडली. मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यास लोकप्रतिनिधींना आपल्या कार्यक्षेत्रात अधिक प्रभावीपणे काम करता येईल आणि जनतेलाही विकासकामांचा लाभ मिळेल, असा दावा त्यांनी केला. आगामी निवडणुकीत कोणाला मतदान करणार, या प्रश्नावर मात्र मतदान हा गोपनीय अधिकार असल्याचे सांगत त्यांनी उत्तर देणे टाळले.

दरम्यान, डिलिमिटेशन विधेयकाला समर्थन द्यायचे की विरोध करायचा, यावर एकत्रित भूमिका ठरवण्यासाठी इंडिया आघाडीने शनिवारी सकाळी 11:30 वाजता दिल्लीत बैठक आयोजित केली आहे. मात्र, या बैठकीपूर्वीच आरजेडीने स्वतंत्रपणे समर्थनाची भूमिका जाहीर केल्याने आघाडीतील एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दुसरीकडे, शरद पवार यांच्या गटाकडून या बैठकीला उपस्थित न राहण्याचे संकेत दिले जात असल्याने इंडिया आघाडीसमोरील अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

follow us