BJP : मोदींची सभा भोवणार? भाजपच्या दोघांची आमदारकी धोक्यात
Political News : पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi) प्रचारसभा भाजपच्याच उमेदवारांना महाग पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मोदींची सभा आणि प्रचारासाठी झालेला खर्च मुदतीत सादर केला नाही तर अंकोला जिल्ह्यातील शिवराम हेब्बार आणि दिनकर शेट्टी यांना सहा वर्षांसाठी अपात्र ठरवले जाऊ शकते. असे झाले तर त्यांची आमदारकीच नाही तर पुढील राजकारणही धोक्यात येऊ शकते. कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील प्रचारावेळी 3 मे रोजी मंत्री हेब्बार आणि आमदार शेट्टी यांच्यासह भाजपच्या अन्य चार उमेदवारांसाठी कर्नाटकातील अंकोला जिल्ह्यात प्रचारसभा घेण्यात आली.
या सभेत पंतप्रधान मोदीही उपस्थित होते. सभेसाठी मोठा खर्च करण्यात आला. त्यामुळे खर्च निरीक्षण समितीने साधारण 1.10 कोटी रुपये इतका खर्च गृहीत धरला. आता सहा उमेदवारांनी हा खर्च वाटून घेतला तर प्रत्येकाच्या वाट्याला 18.33 लाख रुपये इतका खर्च येईल.
“माझ्या आयुष्यातील 4 वर्ष ‘फुकट’ गेली” : आणखी एका बड्या नेत्याने सोडली ठाकरेंची साथ
या व्यतिरिक्त सभेसाठी लोकांना आणण्यासाठी गोवा परिवहन महामंडळाच्या बस वापरण्यात आला. कर्नाटक रस्ते वाहतूक परिवहन महामंडळानेही आयोजकांनी 1.35 कोटी रुपये आकारले आहेत. हा सगळा खर्च जर विचारात घेतला तर निवडणूक आयोगाने जी 40 लाख रुपये खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे ती पार होईल. गोवा परिवहन महामंडळाने किती रक्कम आकारली याची माहिती देण्यास नकार दिला आहे.
यानंतर जिल्हा खर्च निरीक्षकांनी या सहाही उमेदवारांकडून खर्चाचा तपशील मागितला होता. मात्र उमेदवारांनी अधिकाऱ्यांच्या खर्च मोजणीला आव्हान दिले. त्याचेही उत्तर देत निवडणूक आयोगानेच निश्चित केलेल्या दरानेच आम्ही खर्च गृहित धरल्याचे खर्च निरीक्षकांनी स्पष्ट केले.
‘औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन त्यालाच प्रश्न विचारा’; राऊतांचा बावनकुळेंवर पलटवार
तरीदेखील या सहा उमेदवारांनी स्पष्ट केले की प्रचारसभेसाठी भारतीय जनता पार्टीच्या चाहत्यांनीच बस भाड्याने घेतल्या होत्या. त्याच्याशी आमचा काहीच संबंध नाही. प्रचारसभेसाठी चाहत्यांनी वाहने भाड्याने घेतली होती, असे शेट्टी यांनीही स्पष्ट केले. तर दुसरीकडे हेब्बार यांनीही आपल्याला आयोगाकडून कोणतीही नोटीस आली नसल्याचे सांगितले. यानंतर आता या प्रकरणात आणखी काय घडामोडी घडतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.