बृजभूषण सिंहला का वाचवले जातेय? कुस्तीपटूंच्या समर्थनासाठी प्रियांका गांधी जंतर-मंतरवर
Wrestlers Protest : दिल्लीच्या जंतरमंतरवर सुरु असलेला कुस्तीपटूंचे आंदोलन सलग सातव्या दिवशीही सुरूच आहे. आज काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधीही कुस्तीपटूंना भेटण्यासाठी पोहोचल्या. प्रियांका गांधी यांनी विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्याशी चर्चा करून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या.
यावेळी बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या, ” सरकार सांगत आहे की दोन एफआयआर नोंदवण्यात आले आहेत, ज्याची प्रत अद्याप मिळालेली नाही, जेणेकरून त्यात कोणत्या कलमांचा समावेश आहे हे कळू शकेल. एफआयआर नोंदवला असेल तर दाखवावा. या व्यक्तीवर अनेक गंभीर आरोप आहेत. तो व्यक्ती त्या पदावर असताना चौकशी करणे शक्य नाही, त्यामुळे त्यांनी आधी राजीनामा द्यावा.”
ये खिलाड़ी हमारा मान हैं। ये कड़ी मेहनत और संघर्ष करके देश के लिए मेडल जीतती हैं। इनका शोषण, इनका अपमान.. देश की हर एक महिला का अपमान है। इनको न्याय मिले – पूरा देश ये चाहता है। pic.twitter.com/8Ro8GrHKER
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) April 29, 2023
यादरम्यान काँग्रेस नेते दीपेंद्र हुड्डाही देखील प्रियांका गांधी यांच्यासोबत दिसले आणि त्यांनीही खेळाडूंशी संवादही साधला. आजच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल देखील दुपारी ४ वाजता खेळाडूंना भेटणार आहेत. त्यामुळे कुस्तीपटूंच्या आंदोलनाला देशभरातून प्रतिसाद मिळत आहे. विरोधी पक्ष देखील यात उतरला आहे.
दरम्यान भाजपचे खासदार असलेल्या बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांकडून देण्यात आली आहे. खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर पॉक्सो आणि खेळाडूंना अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. महिला खेळाडूंच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Defamation Case : राहुल गांधींना दिलासा मिळणार? याचिकेवर आज गुजरात उच्च न्यायालयात सुनावणी
मात्र हा गुन्हा दाखल झाला असला तरी देखील यातून न्याय मिळणार नाही. त्यामुळे जोपर्यंत खासदार बृजभूषण सिंह यांना अटक होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे. असा पवित्रा या कुस्तीपटुंनी घेतला आहे. यावर पहिलवान सत्यव्रत कादियानने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, एफआयआर दाखल झाला हे चांगल आहे. पण यातून आम्हाला काय मिळणार दिल्ली पोलिसांनी हे पहिल्या दिवशी करायला हवे होते. यावर आमची लीगल टीम काय म्हणते ते पाहुयात. कुस्तीपटुंचं भविष्य सुरक्षित आणि राजकारण आणि कुस्ती वेगवेगळं ठेवायला हवं अशी प्रतिक्रिया या कुस्तीपटुंनी दिली आहे.