राहुल गांधींनी केलं काँग्रेसच्याच खासदाराकडे दुर्लक्ष? नेमकं कारण तरी काय? video व्हायरल

Untitled Design   2023 03 30T161648.385

नवी दिल्ली : भारत जोडो (BHARAT jodo) यात्रेपासून कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे अनेकांच्या गळ्यातील ताईत बनले. मात्र, त्यानंतर त्यांच्या अडचणीत कायम वाढ होत राहिली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. खरंतर राहुल गांधी हे कायम आपल्या राजकीय वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. त्यांनी केलेली वक्तव्यं ही कायम सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. केवळ राहुल गांधींचे वक्तव्यचं नाही तर त्यांची एखादी कृतीही व्हायरल होत असते. आताही त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यात राहुल गांधी हे एका कॉंग्रेस खासदाराला भेटणं टाळत असल्याचं दिसतं.

राहुल गांधी यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसतं की, राहुल गांधी हे संसद भवनात कॉंग्रेसच्या खासदारांच्या बैठकीला गेले होते. ते आपल्या काही सहकाऱ्यांसोबत संसदेत जात होते. यावेळी त्यांच्यासोबत गौरव गोगोई आणि अधीर रंजन चौधरी यांच्यासह कॉंग्रेसचे अनेक खासदार होते. राहुल गांधी हे संसदेत प्रवेश करत असतांना गेटवर कार्ती चिंदबरम (Karti Chindabaram) उभे होते. यावेळी राहुल गांधी यांचे स्वागत अनेक कॉंग्रेस नेत्यांनी केले.

कार्तिक आर्यनने ‘आशिकी 3’ का सोडला? चित्रपटाच्या निर्मात्यांनी सांगितलं सत्य 

राहुल गांधी यांनी अनेक नेत्यांच्या शुभेच्छा स्वीकारत आणि सेकहॅंड करत ते संसदेत जात होते. त्यावेळी संसदेच्या पायऱ्यांवर उभे असलेले कार्ती चिदंबरम हे राहुल गांधींना भेटण्यासाठी जवळ येत असतांना राहुल गांधी हे कार्ती यांच्याकडे दुर्लक्ष करून संसदेत प्रवेश करतात. कार्ती चिदंबरम हे कॉंग्रेस खासदार असून माजी केंद्रीय मंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांचे पुत्र आहे.

राहुल गांधी यांनी भेटणं टाळल्यानं कार्ती चिंदबरही एकटेच संसदेच्या पायऱ्या उतरतांना दिसत आहेत. दरम्यान, राहुल गांधी आणि कार्ती चिंदबरम यांचा हा व्हिडिओ सोशल मीडीयावर जोरदार व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांच्या अनेक संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

दरम्यान, आता bjp च्या आयटी सेलचे प्रमुख असलेले अमित मालवीय यांनी देखील हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी लिहिलं की, कॉंग्रेसमध्ये गांधी असण्याची ही हक्काची भावना आणि अंहकार हा कॉंग्रेसच्या पतनास कारणीभूत असल्याचं त्यांनी सांगितलं. तर राहुल यांची खासदारकी रद्द केल्यानंतर जनमाणसात कोणत्याही प्रकारची नाराजी नसल्याचं पी चिदंबरम यांनी मान्य केले, त्यामुळंच राहुल गांधी यांनी कार्ती यांच्यासोबत बोलण टाळल्याचं मालवीय यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube