‘राष्ट्रीय सरेंडर संघ’ राम माधव यांनी माफी मागताच राहुल गांधींचा टोला
विरोधी पक्षांकडून बरीच टीका झाली असूनही, आम्ही रशियाकडून तेल खरेदी थांबवण्यास सहमत झालो.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Gandhi) यांनी अमेरिकेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते आणि भाजपचे माजी राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी केलेल्या वक्तव्यावरुन कडाडून प्रहार चढवला आहे. राम माधव यांनी आरएसएसचं खरं स्वरूप उघड केलं असल्याचा हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी राम माधव यांनी अमेरिकेसमोर भारताने केलेल्या तडजोडींचा पाढाच वाचला होता. त्यानंतर वाद वाढताच माफी मागितली होती. त्यानंतर आता राहुल यांनी तोच धागा पकडत हल्लाबोल केला.
जागतिक अनिश्चिततेचा मोठा फटका; आयटी क्षेत्रात 7,389 कर्मचाऱ्यांची घट, नोकऱ्यांवर टांगती तलवार
आरएसएसची त्यांनी ‘राष्ट्रीय सरेंडर संघ’ अशी संभावना करत अमेरिकेत निव्वळ लाळघोटेपणा केल्याचा प्रहार केला. अमेरिकेत एका पॅनल चर्चेत बोलताना, भारत अमेरिकेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात कुठे कमी पडला, असा प्रश्न माधव यांनी उपस्थित केला होता. दरम्यान, आरएसएसला लक्ष्य करत राहुल गांधींनी एक्स (X) वर पोस्ट केली, राष्ट्रीय सरेंडर संघ. नागपूरमधील बनावट राष्ट्रवाद. अमेरिकेतील निव्वळ लाळघोटेपणा. त्यांनी पुढे लिहिले की, राम माधव यांनी संघाचा खरा चेहरा उघड केला आहे. या टिप्पणीमुळे काँग्रेस नेतृत्वाने भाजप-आरएसएसला लक्ष्य केले.
राम माधव काय म्हणाले होते?
भारताच्या अमेरिका-अमेरिका संबंधांवर भाजप आणि आरएसएस नेते राम माधव यांच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. वॉशिंग्टनमधील एका कार्यक्रमादरम्यान माधव यांनी अमेरिकेशी चांगले संबंध ठेवण्यात भारताच्या अपयशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, भारताने इराणकडून तेल खरेदी थांबवली, रशियाकडून तेल खरेदी थांबवण्यास सहमती दर्शवली आणि अमेरिकेच्या शुल्काला विरोध केला नाही. मग अमेरिकेसोबत काम करण्यात भारताची कुठे कमतरता आहे? मात्र, विरोधी पक्षांच्या टीकेनंतर राम माधव यांनी माफी मागितली. त्यांनी “भारताने रशियाकडून तेल आयात थांबवण्यास कधीही सहमती दर्शवली नाही. इतकेच नव्हे तर, 50 टक्के शुल्क आकारण्यास भारताचा तीव्र विरोध होता.
सरकारने भारताच्या हिताशी तडजोड केली
राम माधव यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसने केंद्र सरकारवर हल्ला चढवला. पक्षाने आरोप केला की, माधव यांच्या वक्तव्यावरून हे स्पष्टपणे दिसून येते की, मोदी सरकारने अमेरिकेला खूश करण्यासाठी भारताच्या हिताशी तडजोड केली आहे. काँग्रेसने सोशल मीडियावर लिहिले, “ट्रम्प यांना जे हवे ते मोदी करतात. मोदी हे ट्रम्प यांचे बाहुले आहेत. म्हणूनच ट्रम्प भारताला नरक म्हणतात आणि मोदी काही बोलण्याचे धाडस करत नाहीत. हे स्पष्ट आहे की नरेंद्र मोदी पूर्णपणे तडजोडबद्ध झाले आहेत आणि देश त्याचे परिणाम भोगत आहे.”
आम्ही 18 टक्के शुल्कदेखील स्वीकारले
राम माधव यांनी वॉशिंग्टनमधील हडसन इन्स्टिट्यूटमध्ये एका पॅनल चर्चेत भाग घेतला. या पॅनलमध्ये अमेरिकेच्या माजी राजनैतिक अधिकारी एलिझाबेथ थ्रेलकेल्ड आणि अमेरिकेचे माजी उप परराष्ट्र सचिव कर्ट कॅम्पबेल हे देखील उपस्थित होते. चर्चेदरम्यान, माधव यांना अमेरिकेसोबतचे संबंध अधिक दृढ करण्याबाबत एक प्रश्न विचारण्यात आला. उत्तर देताना राम माधव म्हणाले, आम्ही (भारत) इराणकडून तेल खरेदी थांबवण्यास सहमत झालो.
विरोधी पक्षांकडून बरीच टीका झाली असूनही, आम्ही रशियाकडून तेल खरेदी थांबवण्यास सहमत झालो. आम्ही 50 टक्के आयात शुल्कही स्वीकारले. स्वीकृतीचा अर्थ असा की, आम्ही फारसा विरोध केला नाही. आम्ही संयम राखला.” ते पुढे म्हणाले, “आता, नवीन व्यापार करारामध्ये, आम्ही 18 टक्के आयात शुल्कही स्वीकारले आहे, जे पूर्वीपेक्षा जास्त आहे. मग, भारत कुठे मागे पडत आहे? अमेरिकेसोबत काम करताना भारत कोणत्या मुद्द्यांवर कमी पडत आहे?”