Ram Gopal Yadav :…तर आता त्यांच्या बाकी मुलांचाही खून होणार

  • Written By: Published:
Untitled Design (14)

Atiq Ahmed and Asads encounter : सपाचे राष्ट्रीय मुख्य सरचिटणीस प्रा. रामगोपाल यादव यांनी अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या हत्येवरून सरकारवर हल्लाबोल करत, त्यांची हत्या नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आली आहे. अतिक अहमद आणि असदच्या एन्काउंटरनंतर अतिकच्या बाकीच्या मुलांचाही खून होणार आहे, असा गौप्यस्फोट रामगोपाल यादव यांनी केला आहे. ते सैफई येथे माध्यामांशी बोलत होते. तपास यंत्रणांनी प्रकरणात योग्य तपास केला तर मोठे लोक यात अडकतील, असेही ते म्हणाले.

उमेश पाल यांच्या मारेकऱ्यांना जमिनीत गाडले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. तसेच झाले. रामगोपाल यादव म्हणाले की, आतिकच्या मुलाची हत्या होऊ शकते, असे मी यापूर्वीही सांगितले होते. ही गोष्ट खरी ठरली. त्याची बनावट एन्काउंटर झाला. मला सुरक्षा देण्यात यावी, अशी याचिका खुद्द अतिकने सर्वोच्च न्यायालयात केली होती. लोकशाहीच्या इतिहासात कोणत्याही देशात पोलिस कोठडीत अशी हत्या झालेली नाही. ही लोकशाहीची हत्या आहे.

समलैंगिक संबंध : मोठी लोकसंख्या खेड्यात राहते म्हणून….

ते म्हणाले की, सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी एका धर्माच्या लोकांना ठरवून मारणे ही चांगली गोष्ट नाही. रात्री 10 वाजता कोणते मेडिकल असते. हे सर्व नियोजन अगोदरच होते. गुन्हेगारांनी अतीकवर गोळीबार केला पण पोलिसांनी त्या गुन्हेगारांवर एकही गोळी झाडली नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube