रतन टाटांच जीवन महान अन् मृत्यूपत्रही महान; मालमत्तेचा मोठा हिस्सा केला दान, कुणाला काय दिलं?

Ratan Tata Legacy : भारताचे महान उद्योगपती स्व. रतन टाटा यांच्या मृत्यूपत्राबाबातची माहिती समोर आली आहे. (Tata) हा माणूस का महान होता याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. टाटा यांच्या मृत्यूपत्रानुसार त्यांनी त्यांच्या संपत्तीचा मोठा हिस्सा दान केला आहे. त्यांची एकूण संपत्ती अंदाजे 3,800 कोटी रुपये आहे, ज्यात टाटा सन्सचे शेअर्स आणि इतर मालमत्तांचा समावेश आहे. त्यातील बहुतांश रक्कम ‘रतन टाटा एन्डॉवमेंट फाऊंडेशन’ आणि ‘रतन टाटा एन्डॉमेंट ट्रस्ट’ यांना देणगी देण्यात आली आहे. ही रक्कम समाजसेवेसाठी वापरली जाईल.
माजी कर्मचाऱ्याला मिळाली संपत्ती
रतन टाटा यांच्या इतर मालमत्तेपैकी एक तृतीयांश (सुमारे 800 कोटी रुपये), ज्यात बँक एफडी, आर्थिक साधने, घड्याळे आणि पेंटिंग यांचा समावेश आहे, या सर्व गोष्टी त्यांच्या सावत्र बहिणी शिरीन जेजीभॉय आणि दिना जेजीभॉय यांच्याकडं जाईल. तर एक तृतीयांश हिस्सा मोहिनी एम दत्ता या टाटा समूहाच्या माजी कर्मचारी आणि रतन टाटा यांच्या निकटवर्तीयांकडे जाईल.
रतन टाटा यांचा भाऊ जिमी नवल टाटा (82) यांना जुहू बंगल्याचा वाटा मिळेल, तर त्यांचा जवळचा मित्र मेहली मिस्त्री यांना अलिबागची मालमत्ता आणि तीन बंदुका (25 बोअरच्या पिस्तूलसह) मिळतील. रतन टाटा यांनी त्यांच्या पाळीव प्राण्यांसाठी 12 लाख रुपयांचा निधी तयार केला आहे, ज्यातून प्रत्येक प्राण्याला दर तीन महिन्यांनी 30,000 रुपये मिळतील. त्यांचे सहाय्यक शंतनू नायडू यांचं कर्ज माफ करण्यात आलं आहे.
मोठी बातमी! आता कागदपत्रांशिवाय काढता येतील 5 लाख रुपये; EPFO कडून नियमात बदल
रतन टाटा यांच्या विदेशी संपत्तीमध्ये (सुमारे 40 कोटी रुपये) सेशेल्समधील जमीन, वेल्स फार्गो आणि मॉर्गन स्टॅनली येथील बँक खाती आणि कंपन्यांमधील शेअर्स यांचा समावेश आहे. त्यांची 65 घड्याळे (Bvlgari, Patek Philippe, Tissot इ.) देखील इस्टेटमध्ये समाविष्ट आहेत. मेहली मिस्त्री यांना अलिबाग बंगला भेट देताना रतन टाटा यांनी लिहिलं, की ही मालमत्ता बांधण्यात मिस्त्री यांचं मोठं योगदान आहे. आशा आहे की, हे ठिकाण त्यांना आनंदाच्या क्षणांची आठवण करून देईल.