RBI Report : भारतीयांची उधळपट्टी वाढली, कर्ज काढून मौजमज्जा; आरबीआयचा धक्कादायक खुलासा

  • Written By: Published:
RBI Report : भारतीयांची उधळपट्टी वाढली, कर्ज काढून मौजमज्जा; आरबीआयचा धक्कादायक खुलासा

RBI Report Household saving : कोणत्याही देशात लोकांचे उत्पन्न किती वाढते किंवा कमी होत आहे? हे मोजण्यासाठी दरडोई उत्पन्न (per capita income) पाहिलं जातं. आपल्या देशाबद्दल बोलायचं झालं तर भारतातील लोकांचे उत्पन्न वाढत आहे. पण सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे कमाई वाढल्यानंतरही लोकांच्या हातात पैसा उरत नाही. लोकांचा खर्च वाढल्यानं त्यांची बचत कमी झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अहवालात ही बाब समोर आली आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कौटुंबिक मालमत्ता आणि दायित्वांवरील ताज्या अहवालानुसार, भारतातील घरगुती बचत 50 वर्षांतील सर्वात निचांकी पातळीवर आली आहे. त्यामुळे बचत कमी झाली आणि जनता कर्जाच्या जाळ्यात अडकत चालली आहे. सध्या परिस्थिती अशी आहे की बचत विसरून लोक आपले छंद आणि गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज घेत आहेत. आरबीआयच्या आकडेवारीनुसार, 2022-23 दरम्यान भारताच्या घरगुती बचतीत मोठी घट झाली आहे. या काळात घरगुती बचत 5.1 टक्क्यांवर घसरली आहे.

आकडेवारी काय सांगते?

आरबीआयच्या अहवालानुसार, भारताच्या जीडीपीच्या दृष्टीने बचतीचे आकडे पाहिले तर निव्वळ बचत सुमारे १३ लाख कोटी आहे. हा आकडा गेल्या 50 वर्षांतील सर्वात कमी आहे. आरबीआयच्या अहवालानुसार यामागे महागाई हेही महत्त्वाचे कारण आहे. वास्तविक वाढत्या महागाईमुळे लोकांना बचत करता येत नाही. उलट ते आपल्या गरजा भागवण्यासाठी कर्जाचा सहारा घेत आहेत, अशी बाब समोर आली आहे.

NCP News : ‘पडळकरांना जोडे मारा, एक लाख मिळवा’; अजित पवार गटाची घोषणा 

लोकांवर कर्ज वाढतंय
लोकांची आर्थिक जबाबदारी झपाट्याने वाढत असल्याचेही आरबीआयच्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे छोट्या-छोट्या गोष्टींसाठीही लोक कर्जाचा सहारा घेऊ लागले आहेत. 2021-22 मध्ये आर्थिक दायित्व केवळ 3.8 टक्के होते. जे 2022-23 मध्ये 5.8 टक्के झाले आहे. आजच्या युगात जमीन, घर, दुकान इत्यादी खरेदी करण्यासाठी लोक कर्ज घेत आहेत. याशिवाय लोक लग्नसोहळा आणि अगदी हनिमूनसारख्या लक्झरी कारणांसाठीही कर्जाची मदत घेत आहेत. वास्तविक, कोरोनानंतर लोकांचा खप वाढला आहे. लोकांचे उत्पन्न वाढले नाही असे नाही. मात्र उत्पन्नाच्या तुलनेत खर्चात वाढ होणे ही चिंतेची बाब आहे.

कमाई वाढत आहे

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतातील लोकांचे उत्पन्न वाढले आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, भारताचे दरडोई उत्पन्न 2011-12 च्या तुलनेत 35 टक्क्यांनी वाढले आहे. सन 2014-15 मध्ये भारतातील लोकांचे दरडोई उत्पन्न अंदाजे 72,805 रुपये होते, जे 2022-23 मध्ये वाढून 98,374 रुपये झाले आहे. मात्र, अहवालानुसार, बचत करण्याचं प्रमाण वाढलं आहे.

 

 

 

 

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube