By-Election Result 2025 : ‘या’ 8 जागांसाठीच्या पोटनिवडणुकीचे निकाल आज होणार जाहीर, कोण बाजी मारणार?

By-Election Result 2025 : आज बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहे. बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीए येणार की आरजेडी

  • Written By: Published:
By Election Result 2025

By-Election Result 2025 : आज बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहे. बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीए येणार की आरजेडी आणि काँग्रेस आघाडी धक्का देणार याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे तर दुसरीकडे आज आठ विधानसभा जागांसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकींचे निकाल देखील जाहीर होणार आहे.

तेलंगणा आणि जम्मू आणि काश्मीरसह सहा राज्यांमधील आठ विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहे. राजस्थानमधील अंता, झारखंडमधील घाटशिला, पंजाबमधील तरनतारन, तेलंगणातील जुबली हिल्स, मिझोराममधील दंपा, ओडिशातील नुआपाडा आणि जम्मू आणि काश्मीरमधील बडगाम आणि नागरोटा या जागांचे निकाल आज जाहीर केले जातील.

आमदारांच्या निधनानंतर या जागा रिकाम्या

जम्मू आणि काश्मीरमधील नागरोटा, झारखंडमधील घाटशिला (एसटी), तेलंगणातील जुबली हिल्स, पंजाबमधील तरनतारन, मिझोराममधील दंपा (एसटी) आणि ओडिशातील नुआपाडा या ठिकाणी विद्यमान आमदारांच्या निधनानंतर निवडणुका झाल्या.

उमर अब्दुल्ला यांच्या राजीनाम्यानंतर बडगामची जागा रिक्त

उमर अब्दुल्ला यांनी बडगाम विधानसभा मतदारसंघातून राजीनामा दिल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीचे निकालही आज जाहीर होणार आहेत. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ओमर अब्दुल्ला यांनी गंदरबल आणि बडगाम या दोन जागा लढवल्या आणि दोन्ही जागा जिंकल्या. परिणामी, उमर यांनी बडगाम सोडले आणि गंदरबल कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.

घाटसिला येथे एमएम विरुद्ध भाजप

माजी शिक्षणमंत्री रामदास सोरेन यांच्या निधनानंतर झारखंडची घाटसिला विधानसभा जागा रिक्त झाली. या जागेसाठी रामदास यांचे पुत्र आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते सोमेश चंद्र सोरेन आणि भाजपचे बाबूलाल सोरेन यांच्यात थेट लढत आहे.

ओडिशातील नुआपाडा पोटनिवडणूक महत्त्वाची का ?

गेल्या वर्षी जूनमध्ये सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारसाठी नुआपाडा पोटनिवडणूक निवडणूक चाचणी ठरू शकते. जरी चौदा उमेदवार रिंगणात असले तरी, मुख्य स्पर्धा भाजप, बीजेडी आणि काँग्रेस या तीन पक्षांमध्ये आहे.

‘या’ पाच राशींना आज धोका; जाणून घ्या मेष ते मीन पर्यंत आजचा दिवस कसा असेल?

जुबली हिल्समध्ये कोण रिंगणात ?

तेलंगणातील ज्युबिली हिल्स विधानसभा जागेसाठी मतमोजणी लवकरच सुरू होणार आहे. सत्ताधारी काँग्रेस आणि भारत राष्ट्र समिती (BRS) यांच्यात चुरशीची लढत आहे. या पोटनिवडणुकीत भाजपने एल. दीपक रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे.

follow us