संघ कायम देशातील प्रत्येक भाषेला राष्ट्रभाषा मानतो; भाषावादावर आरएसएसचं मोठं वक्तव्य

RSS Spoksperson Sunil Ambekar on Hindi Marathi Language Disputes : राज्यमध्ये सरकारकडून पहिलीपासून तिसऱ्या भाषेच्या सक्तिचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. पण तरी देखील अद्यापही राज्यामध्ये हिंदी-मराठी भाषावाद निर्माण झाला आहे. त्यावर आता राष्ट्रीय स्वंयसेवक संघाकडून वक्तव्य करण्यात आलं आहे. रविवारी 6 जुलैला आरएसएसची 3 दिवसीय बैठक पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये या विषयावर प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
भाषावादावर आरएसएसचं मोठं वक्तव्य
बैठकीनंतर सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये आरएसएसचे प्रवक्ते सुनील आंबेकर यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यामध्ये विविध विषयांचा उल्लेख करण्यात आला. त्यामध्ये भाषावादावर देखील चर्चा करण्यात आली. ते म्हणाले की, संघ कायम देशातील प्रत्येक भाषेला राष्ट्रभाषा मानतो. तसेच आपण सर्व पहिल्यापासूनच आपआपल्या भाषांमध्ये शिक्षण घेत आलेलो आहोत. संघामध्ये पहिल्यापासूनच ही गोष्ट रूजलेली आहे. असं म्हणत आरएसएसकडून भाषावादावर वक्तव्य करण्यता आलं आहे.
न्यायालयांना सिद्धांतांचा विसर पण मी… सिसोदिया अन् के. कविता केसवरून मुख्य न्यायधीशांचे ताशेरे
भारतीय जनता पक्षाच्या त्रिसूत्री भाषा धोरणाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विरोध! मग फडणवीस मराठी माणसावर हिंदीची सक्ती का करत आहेत?
प्रत्येक भाषा ही राष्ट्र भाषा असल्याचे संघाचे म्हणणे!
मग महाराष्ट्रात भाषे वरून भांडणे का लावली जात आहेत?
@Dev_Fadnavis
@RSSorg pic.twitter.com/X1BS6G1uhN— Sanjay Raut (@rautsanjay61) July 7, 2025
त्याचबरोबर या पत्रकार परिषदेमध्ये संघाकडून मणिपूरमध्ये शांतता प्रस्तापित करण्यावर देखील चर्चा करण्यात आली आहे. त्यासाठी संघाकडून मैतई समुदायाच्या लोकांमध्ये काम केले जात आहेत. त्यामुळे अजून वेळ लागेल पण मणिपूरमधील स्थिती बरचशी सुधारली आहे. असं देखील यावेळी सांगण्यात आलं.
व्हिट्स हॉटेल प्रकरण विधानसभेत पेटलं; आंबादास दानवेंकडून शिरसांटावर वार, फडणवीसांचा कारवाईचा शब्द
दुसरीकडे भाषावादावर भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्याकडून मात्र महाराष्ट्राविरूद्ध आणि मराठी माणसांचा अपमान करणारी विधान करण्यात येत आहेत.