लापता गृहमंत्री कोठे आहेत ? त्यांच्यावर चित्रपट काढणार, संजय राऊतांचा अमित शाहांवर हल्लाबोल

Sanjay Raut:

  • Written By: Published:
Sanjay Raut On Amit Shah

Sanjay Raut On Amit Shah : लोकसभेत सार्वजनिक परीक्षा (अनुचित साधनांना प्रतिबंध) दुरुस्ती विधेयक 2026 मंजूर झाल्यानंतर राज्यसभेत हे विधेयक मांडण्यात आले आहे. राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी थेट गृहमंत्री अमित शाह ( Amit Shah) यांना घेरले आहे. त्यानंतर उबाठाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी गृहमंत्री शाह यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. आंदोलनाला पंतप्रधान, गृहमंत्री घाबरले आहेत. ते बेपत्ता झाले आहेत. आम्ही त्यांचा शोध घेत आहोत. लापता गृहमंत्री असा चित्रपट बनवण्याचा आपला विचार आहे. आता कुठे आहेत गृहमंत्री? असा हल्लाबोल राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी चर्चेची सुरुवात वादळी केलीय. कवी पाश यांच्या ओळीपासून राऊत यांनी सरुवात केली. सबसे खतरनाक होता है हमारे सपनों का मर जाना! सबसे खतरनाक होता है हमारे सपनों का मर जाना ! भारतातील लाखो लोकांचे स्वप्न मर गये है, या मारा गया है ! 20 जुलैला जंतर मंतरवर स्वप्नावर लाठीचार्ज झाला. टीअर गॅस सोडण्यात आले. पेलेट गन चालवून विद्यार्थ्यांचे स्वप्न खत्म केले आहे.

या सभागृहात बहुतेक नेते आहेत. त्यांचे राजकारण विद्यार्थी आंदोलनातून सुरू झाले आहे. मला आश्चर्य आहे, नड्डा, विनोद तावडे हे विद्यार्थी आंदोलनातून पुढे आले आहेत. कुणाला वाटले नाही, मुले लाठी खात आहे. त्यांच्याशी चर्चा करावी, संवेदना व्यक्त करावी. त्यांना समजविले पाहिजे होते. असे कुणालाच वाटले नाही, असा सवाल राऊत यांनी केलाय.

आणीबाणीची चर्चा होती येथे. आणीबाणीची सुरुवात विद्यार्थी आंदोलनातून झाली आहे. आता तुम्ही विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला का घाबरत आहात. पंतप्रधान, गृहमंत्री घाबरले आहेत. लापता आहेत. त्यांना आम्ही शोधत आहोत. मी तर चित्रपट बनविणार आहे, लापता गृहमंत्री. कोठे आहेत, गृहमंत्री. प्रत्येक गोष्टीचे क्रेडिट घेतात. मोठे आंदोलन झाले आहेत, लाठीचार्ज झाला. पेलेट गन चालविले आहेत. त्यावर गृहमंत्री काही बोलले नाहीत. पंतप्रधान रात्री बारा वाजतात बोलतात, असे राऊत म्हणाले. त्यावरून सत्ताधारी खासदारांनी गोंधळ घातला आहे.

महाराष्ट्रात पेपर लीकमध्ये पकडले गेलेले सर्व जण भाजपचे सदस्य असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला. नीट परीक्षा ही केवळ परीक्षा नाही. त्यांचे जीवन आणि भविष्याची निर्णय करण्याची व्यवस्था आहे. ही व्यवस्था सरकारच्या सिस्टिममुळे बरबाद झाली आहे. त्याची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे आहे. नवीन कायद्यात काही नवीन नाही, असे राऊत म्हणाले.

वेळ संपला असल्याने राऊत यांनी थांबावे, अशी विनंती स्पीकर यांनी केली. त्यावर राऊत चिडले ते म्हणाले, 25 दिवस विद्यार्थी उपोषणाला बसले. त्यावेळी वेळ खत्म झाला नाही. आता वेळ संपत आहे. या नवीन कायद्याने काही होणार नाही. पेपर सेट करण्यापासून शेवटपर्यंतच सगळे त्यांचे लोक बसले आहेत. तिथून पेपर लीक होतो. कसे-कसे लोक कुलगुरू होत आहेत. महान पदावर अशा लोकांवर बसवत आहे. त्यामुळे व्यवस्थेबाबत चिंता होत आहे. या देशात शिक्षणक्षेत्राला प्रतिष्ठा राहिली आहे. परंतु आपण शिक्षण क्षेत्राला बरबाद केले आहे. ज्या देशातील राम मंदिराची दानपेटी लीक होत आहेत, येथे पेपर लीक होणे मोठी बाब नाही.

follow us