एकजुट दिसली तरच मोठं यश; ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्याकडून इंडिया आघाडीला घरचा आहेर

एकजुट दिसली तरच मोठं यश; ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्याकडून इंडिया आघाडीला घरचा आहेर

Kapil Sibal on India Alliance : विरोधकांच्या आघाडीची एक औपचारिक रचना असायला हवी ज्यामध्ये विरोधकांच्या आघाडीची अधिकृत भूमिका मांडायला अधिकृत प्रवक्ते असायला हवेत. इंडिया आघाडीने आघाडीसारखे दिसले पाहिजे, (India Alliance) त्यात बिघाडी दिसता कामा नये, असं मत राज्यसभेतील खासदार आणि ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी व्यक्त केलं आहे.

इंडियाआघाडीतील पक्षांची सर्वांचे मिळून एक सर्वसमावेशक धोरण, वैचारिक चौकट आणि भविष्यासाठी योजना असायला हवी, असे मत सिब्बल यांनी व्यक्त केले. नुकत्याच काही राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीतील मतभेद उघडपणे दिसून आले होते. त्याबाबत विचारले असता, हे चित्र फारसे चांगले नसल्याचे सिब्बल म्हणाले.

अचानक बैठकीला आलेल्या कपिल सिब्बलांवर काँग्रेसचा राग का ?

आघाडीने लोकांमध्ये आघाडीसारखेच दिसायला हवं, आघाडीत बिघाडी दिसणे योग्य नाही, राष्ट्रीय स्तरावर अथवा राष्ट्रीय राजकारणात जे मुद्दे प्रभावी ठरत आहेत, अशा मुद्द्यांवर इंडिया आघातील सर्वांची मिळून एक भूमिका असायला हवी आणि ती तितक्याच प्रभावीपणे मांडण्यासाठी प्रवक्ते देखील हवेत. तोपर्यंत इंडिया आघाडी प्रभावीपणे वाटचाल करू शकणार नाही.

घटकपक्षांची भूमिका

भाजपकडे बहुमत नाही. त्यामुळे याबाबत सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) घटक पक्षांचं म्हणणं काय आहे हे पाहावं लागणार आहे. बिहारमध्ये आता विधानसभा निवड होऊ घातली आहे. त्यामुळे वक्फ विधेयकाचा बिहारच्या निवडणुकीवर काय परिणाम होईल असा त्यांच्यासमोर प्रश्‍न असणार आहे. त्यामुळे या विधेयकाची नेमकी वाटचाल कशी असेल हे मला आताच सांगता येणार नाही असं सांगत सिब्बल यांनी वक्फ बोर्डावरही भाष्य केलं आहे.

आधी जनगणना घ्या

मतदारसंघ फेररचनेबद्दल बोलताना सिब्बल म्हणाले, याचा देशाच्या राजकारणावर गंभीर परिणाम होणार आहे. त्यामुळेच त्यावर चर्चा करण्यासाठी स्टॅलिन यांनी याबाबत बैठक घेतली होती आणि काँग्रेससह अनेक पक्षांचे प्रतिनिधी त्याला उपस्थित होते. पण मतदारसंघ फेररचना करण्याआधी जनगणना करणे आवश्यक आहे. जोपर्यंत जनगणना होत नाही तोवर मतदारसंघ फेररचना होणार नाही. ‘अभी दिल्ली दूर है,’ असे म्हणत त्यांनी फेररचनेला अद्याप पुरेसा अवकाश असल्यांचं म्हटलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube