आक्रमक हिंदुत्व अन् हिंदी विरोध..राज-उद्धव एकी काँग्रेसला डोकेदुखी

आक्रमक हिंदुत्व अन् हिंदी विरोध..राज-उद्धव एकी काँग्रेसला डोकेदुखी

Maharashtra Politics : मराठी भाषेच्या मुद्द्यावर राज आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्र येण्याने काँग्रेसच्या (Maharashtra Politics) अडचणी वाढल्या आहेत. एकीकडे महाराष्ट्राच्या राजकारणाचा प्रश्न आहे तर दुसरीकडे इंडिया आघाडीचे (INDIA Alliance) भवितव्य. आणखी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बिहारच्या निवडणुका. राज ठाकरे यांचे (Raj Thackeray) आक्रमक हिंदुत्व आणि हिंदी भाषा विरोधी धोरण (Hindi Language Row) पाहता त्यांना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील आघाडीत घेण्यात काँग्रेसमध्ये अस्वस्थता (Congress Party) जाणवू लागली आहे.

राज ठाकरे यांची भूमिका काँग्रेसला उत्तर भारतात आजिबात सूट करत नाही. बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा लालू यादव आणि समाजवादी पक्षालाही राज ठाकरेंची भूमिका मान्य नाही. काँग्रेसमधील एक गट राज ठाकरेंना सोबत घेण्याच्या विरोधात आहे. राज ठाकरे यांचे भाजपशी दीर्घ काळ चांगले संबंध राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास करणे कठीण आहे असा सूर काँग्रेसमध्ये आहे. तिकडे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट (Uddhav Thackeray) केले आहे की फक्त व्यासपीठावरच नाही तर आम्ही कायम एकत्र राहण्यासाठी एकत्र आलो आहोत.

उद्धव ठाकरेंच्या या घोषणेनंतर काँग्रेसमध्ये अस्वस्थता वाढली आहे. राज ठाकरेंच्या मनसेला आघाडीत घ्यायचे किंवा नाही अशा द्विधा मनस्थितीत काँग्रेस नेते अडकले आहेत. या बाबतीत उद्धव ठाकरेंनी काँग्रेसशी कोणताही संपर्क साधलेला नाही. पण याबाबतीत पक्षाची भूमिका काय असावी यावर चर्चा मात्र सुरू आहे. राज ठाकरे यांचे भविष्यातील राजकारण काय राहील यावर त्यांच्या पक्षाचे महाविकास आघाडीत सामील (MVA) होणे अवलंबून राहील.

Video : आमच्या पैशांवर जगता, आपटून-आपटून मारू; भाजप खासदाराने महाराष्ट्राविरूद्ध गरळ ओकली

काँग्रेस लालू अन् अखिलेश यांची भूमिका काय

काँग्रेसचे राजकारण फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरात आहे. लालू प्रसाद यादव यांचा राजद आणि अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष (Samajwadi Party) काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीत आहे. आता या पक्षांची भूमिका काय आहे यालाही महत्त्व आहे. उद्धव आणि राज ठाकरे यांच्याबरोबर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे देखील (Supriya Sule) उपस्थित होत्या. पण याच वेळी काँग्रेसचे नेते गैरहजर होते.

यावरून या संभाव्य आघाडीची वाटचाल कठीण राहील यावर शिक्कामोर्तब झाले. परंतु राजकारणात कधी काय घडेल याचा काहीच अंदाज नसतो. उद्धव ठाकरे यांची शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जाऊ शकते तर राज ठाकरे यांचा मनसे का सोबत येऊ शकत नाही? असा सवाल राजकीय वर्तुळातून विचारला जात आहे. जर खरंच मनसे महाविकास आघाडीत आला तर काँग्रेसची भूमिका काय राहील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महापालिका सत्तेसाठीच मनसेची दाढी कुरवाळण्याचं काम; आशिष शेलारांनी एकेक मुद्दा खोडून काढला…

follow us
  • fb
  • instagram
  • youtube