Shinde Vs Thackeray : सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा भेदक प्रश्न : एकनाथ शिंदे यांची झोप उडू शकते…
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील शिवसेना पक्षातील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटांमधील अंतर्गत मतभेदांमुळे उद्भवलेल्या मुद्द्यांवर सुनावणी करताना अपात्रतेच्या प्रक्रियेच्या प्रलंबित कालावधीत फ्लोअर टेस्ट घेणे योग्य ठरेल का, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे गटाच्या वकिलांना केली. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड (D. Y. Chandrachud) यांच्या या भेदक प्रश्नामुळे मात्र एकनाथ शिंदे यांची झोप उडू शकते, असे चित्र निर्माण झाले आहे.
पक्षात फूट पडल्यामुळे आमदारांचा एक गट अपात्र ठरू शकतो. असे सर्वोच्च न्यायालयाने पक्षांतराला कायदेशीर मान्यता देण्यासाठी टिप्पणी करताना एकनाथ शिंदे गटाच्या वकिलांना या संदर्भात प्रश्न विचारला आहे. जर सभागृहात चाचणीवेळी दहाव्या परिशिष्टाचे उल्लंघन होत आहे का, असा देखील प्रश्न न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शाह, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिम्हा यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी करताना केला. या एका प्रश्नाने मात्र शिंदे यांची झोप उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Ajit Pawar यांनी ‘त्या’ अजब आदेशावरुन शिंदे-फडणवीस सरकारला सुनावले
ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल यांनी एकनाथ शिंदे गटाची बाजू मांडताना एस. आर. बोम्मई वि. युनियन ऑफ इंडिया आणि मध्य प्रदेशच्या शिवराज सिंह चव्हाण यामधील निकालांचा संदर्भ दिला आहे. त्यावर डी. वाय चंद्रचूड यांनी टिपणी करताना म्हटले की, फ्लोर टेस्टची घेणे योग्य ठरेल का, पक्षात फूट पडल्यामुळे आमदारांचा एक गट अपात्र ठरू शकतो, असा प्रश्न उपस्थित केला आहे.