आमदाराच्या कुटुंबाचा अमेरिकेत करुण अंत; ख्रिसमसची सुट्टी सहा जणांच्या जीवावर बेतली
अमरावती : अमेरिकेतील टेक्सास येथे घडलेल्या भीषण अपघातात आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हे सर्व जण मुम्मीदिवरम मतदारसंघाचे वायएसआर काँग्रेस (YSR Congress) आमदार पी व्यंकट सतीश कुमार यांचे नातेवाईक होते. जॉर्जिया राज्यातील अटलांटा येथून ख्रिसमसच्या सुट्टीसाठीत ते टेक्सास येथील त्यांच्या नातेवाईकाच्या घरी गेले होते. तिथे एका प्राणीसंग्रहालयातून परताना मालवाहू वाहनाने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. (Six people from Andhra Pradesh have died in a terrible accident in Texas, USA.)
Amol Kolhe : अजितदादा आजकाल कुणाची स्क्रिप्ट वाचतात? अमोल कोल्हेंचा थेट सवाल
याबाबत आमदार पी व्यंकट सतीश कुमार यांनी माध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, पी. नागेश्वर राव, सीता महालक्ष्मी, नवीन, कृतिक, निशिता यांचा मृत्यू झाला आहे. हे माझे काका, काकू, तिची मुलगी, दोन नातवंडे असे कुटुंब होते. हे सर्व आंध्र प्रदेशमधील कोनासीमा जिल्ह्यातील अमलापुरम शहरातील रहिवासी होते. पण सध्या जॉर्जिया राज्यातील अटलांटा येथे वास्तव्यास होते. या सर्वांना नाताळच्या सुट्ट्या असल्याने ते टेक्सास येथील त्यांचे नातेवाईक विशाल यांच्या घरी गेले होते.
Karnataka : कर्नाटकात राडा! ‘इंग्रजी’ फलकांची तोडफोड; ’60 टक्के कन्नड’च्या आदेशाचा वाद पेटला
टेक्सासमधील एका प्राणीसंग्रहालय भेट देऊन परतत असताना एका मालवाहू वाहनाने त्यांच्या गाडीला धडक दिली. अमेरिकेच्या वेळेप्रमाणे मंगळवारी (26 डिसेंबर) दुपारी चार वाजता हा अपघात झाला. धडक दिलेल्या मालवाहू वाहनात दोन जण होते. ते दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. तर कारमधील लोकेश अपघातातून बचावला असून त्याला विमानाने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तेलुगू असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका (TANA) सर्व मृतदेह भारतात परत पाठवण्यासाठी मदत करत आहे.