जननिवेश एसआयपी ठरणार गुंतवणुकदारांचा आधार; स्टेट बँक म्युच्युअल फंडकडून नवीन SIP लाँच

  • Written By: Published:
जननिवेश एसआयपी ठरणार गुंतवणुकदारांचा आधार; स्टेट बँक म्युच्युअल फंडकडून नवीन SIP लाँच

Jananivesh SIP Plan : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहकार्यानं स्टेट बँक म्युच्युअल फंडने जननिवेश एसआयपी योजना सुरु केली आहे. या योजनेद्वारे देशातील नागरिक मोठ्या (SBI) संख्येद्वारे म्युच्युअल फंड सोबत जोडले जातील. जननिवेश एसआयपीमध्ये 250 रुपयांपासून गुंतवणूक करता येणार आहे. ही गुंतवणूक दैनंदिन, साप्ताहिक आणि दरमहा करता येतील. या एसआयपीच्या माध्यमातून नागरिकांना गुंतवणुकीची सुरुवात करता येईल.

एसआयपी कुठं उपलब्ध असेल?

एसबीआय म्युच्युअल फंडच्या जननिवेश एसआयीपमध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय एसबीआय योनो प्लॅटफॉर्म याशिवाय पेटीएम, ग्रो आणि झिरोधावर उपलब्ध असेल. गुंतवणूकदरांना या माध्यमातून डिजीटल इंटरफेस वापरुन सोप्या पद्धतीनं गुंतवणूक करता येईल.

जननिवेश एसआयपीद्वारे पहिल्यांदा गुंतवणूक करणारे, लघू बचत करणारे व्यक्ती, ग्रामीण, निमशहरी आणि शहरी भागातील छोट्या गुंतवणूकदारांसाठी ही योजना महत्त्वाची ठरेल. या योजनेद्वारे म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा किफायतशीर पर्याय उपलब्ध होईल. यामुळं संबंधित व्यक्ती आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल.

तयारीला लागा, SBI मध्ये 13,735 जागांसाठी मेगा भरती, जाणून घ्या संपूर्ण तपशील

जननिवेश एसआयपीद्वारे ग्रामीण, निमशहरी आणि शहरातील पहिल्यांदा गुंतवणूक करणाऱ्यांना आकर्षित केलं जाईल. 250 रुपयांच्या एसआयपीएसह म्युच्युअल फंडचा किफायतशीर पर्याय उपलब्द होईल. शहरी गुंतवणूकदार : शहरातील छोट्या गुंतवणूकदारांना गुंतवणूक सल्लागाराचं मार्गदर्शन घेणं शक्य नसतं, मात्र ते डिजीटल प्लॅटफॉर्मचा वापर करु शकतात त्यांच्यासाठी जननिवेश एसआयपी महत्त्वाची ठरेल.

एसबीआय म्युच्युअल फंडचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ नंद किशोर यांनी जननिवेश एसआयपी हे वेल्थ क्रिएशनच्या दृष्टीनं वित्तीय समावेशनसाठी महत्त्वाचं पाऊल आहे. डिजीटल प्लॅटफॉर्मद्वारे आम्ही प्रथम गुंतवणूकदारांना आकर्षित करणार आहे. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांना 250 रुपयांपासून एसआयपी सुरु करता येईल.

सेबीप्रमुख बुच काय म्हणाल्या?

सेबीप्रमुख माधबी पुरी- बुच यांनी एसआयपी सुरु करण्यासाठी आताच्या वेळे सारखी योग्य वेळ दुसरी नसल्याचं म्हटलं. विदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री होत असताना देशांतर्गत गुंतवणूकदार अन् रिटेल गुंतवणूकदारांकडून ती कमी भरुन काढली जात आहे, असं माधबी पुरी बुच म्हणाल्या.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या