Karnataka Government Formation : सत्तास्थापनेदरम्यान सुन्नी वक्फ बोर्डाची ‘ही’ मोठी मागणी, कोण होणार मुख्यमंत्री?

Karnataka Government Formation : सत्तास्थापनेदरम्यान सुन्नी वक्फ बोर्डाची ‘ही’ मोठी मागणी, कोण होणार मुख्यमंत्री?

Sunni Waqf Board Demand in Karnataka Government Formation : कर्नाटक निवडणुकीत (Karnataka Election)कॉंग्रेसनं बहुमत मिळवल्यानंतर आता काँग्रेस सरकार (Karnataka Government Formation)स्थापन करण्यासाठी एकवटली आहे. आता कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कॉंग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक संपली आहे. या बैठकीत मात्र मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय होऊ शकला नाही, त्याचा सस्पेन्स कायम आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर (Mallikarjun Kharge) सोडण्याचा निर्णय विधिमंडळ पक्षाने एकमताने घेतला आहे.

भाजपची मोठी खेळी; डी. के. शिवकुमार यांच्या नाड्या आवळण्यासाठी प्रवीण सूद यांची CBI संचालकपदी नियुक्ती

या दरम्यान आता सुन्नी वक्फ बोर्डाने मोठी मागणी केली आहे. सुन्नी उलेमा बोर्डाचे मुस्लीम नेत्यांनी मागणी केली आहे. की, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री हे मुस्लीम समाजाचे असावेत. त्याचबरोबर 5 मुस्लीम आमदारांना मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या खात्यांचं मंत्रिपद देण्यात यावं. गृह, महसूल, आरोग्य व इतर विभाग असावेत. अशी मागणी सत्तास्थापनेदरम्यान सुन्नी वक्फ बोर्डाने केली आहे.

Karnataka Government Formation : काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक संपली; मुख्यमंत्रिपदाचा सस्पेन्स कायम

दरम्यान बंगळुरूमधील शांगरी-ला हॉटेलमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक सुरू आहे. या बैठकीत राज्याच्या पुढील मुख्यमंत्र्यांच्या नावावर चर्चा सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. डीके शिवकुमार यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणं आहे की, मुख्यमंत्रिपदाशिवाय काहीही मान्य नाही, आपल्याला 75 आमदारांचा पाठिंबा असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

त्यामुळे एकीकडे अद्याप देखील मुख्यमंत्री पदाचा सस्पेन्स कायम असातना आता सुन्नी वक्फ बोर्डाची ही मागणी सत्तास्थापनेमध्ये कीती प्रभाव टाकणार ठरते हे पाहणं महत्त्वाचां ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube