तेलंगणातून गोव्यात आली, लूक अन् धर्म बदलला, लग्न केलं… पण आधार कार्डमुळे बेपत्ता महिला पुन्हा सापडली

तेलंगणातून गोव्यात आली, लूक अन् धर्म बदलला, लग्न केलं… पण आधार कार्डमुळे बेपत्ता महिला पुन्हा सापडली

पणजी : तेलंगणाच्या महिला सुरक्षा शाखा आणि मानवी तस्करीविरोधी पथकाने पाच वर्षांपासून बेपत्ता झालेल्या एका महिलेचा अत्यंत हुशारीने शोध लावला आहे. ही महिला पाच वर्षांपूर्वी तेलंगणाच्या हुमायूननगरमधून बेपत्ता झाली होती. बेपत्ता झाल्यानंतर तिने गोवा गाठलं, स्वतःची ओळख बदलली, लूक बदलला आणि धर्म बदलून राहू लागली. काही दिवसातच दुसरे लग्न करुन नवीन संसारही थाटला. मात्र नुकतेच आधार कार्ड अपडेट केल्याने पाच वर्षांपासून बेपत्ता असलेल्या या महिलेचा पोलिसांनी शोध लावला आहे. (Telangana women’s had vanished, wiped out her digital trail, and started a new life with a completely new identity)

याबाबत माहिती देताना महिला सुरक्षा शाखेच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक शिखा गोयल म्हणाल्या, जून 2018 मध्ये राज्याच्या हुमायूननगरमधून 36 वर्षीय एक विवाहित महिला बेपत्ता झाली. एका श्रीमंत आणि उच्चभ्रू कुटुंबातून आलेल्या महिलेने गायब झाल्यानंतर गोव्यात जावून स्वतःची वास्तविक आणि डिजीटल ओळख पुसून टाकली. लूक बदलला आणि धर्म बदलून राहू लागली. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, तिने दुसऱ्या कोणाशी तरी लग्नही केले आणि महाराष्ट्रातील एका एनजीओसोबत काम करून नवीन आयुष्य सुरू केले.

भारतीयांनी इनरवेअर घालणं बंद केलं? रुपा ते जॉकीपर्यंत बड्या कंपन्यांच्या विक्रीत मोठी घसरण

पाच वर्षांपूर्वी ही महिला घरच्यांना न सांगता मोबाईल फोन सोडून गायब झाली होती. ती बेपत्ता होण्याची ही पहिली वेळ नव्हती, यापूर्वीही पतीसोबतच्या वादांमुळे 2014 आणि 2015 मध्ये ती गायब झाली होती. 2018 मध्ये तिच्या पतीवर तिच्या वडिलांनी हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला होता, याच वादांमुळे ती गायब झाली असावी असे आम्हाला वाटले, त्यामुळे सुरुवातीला आम्हाला कुटुंबातील सदस्यांवर संशय आला, परंतु हळू हळू नव्याने सुरुवात करण्यासाठी डिजिटल आणि वैयक्तिक ओळख पुसून टाकण्याचे हे प्रकरण असल्याचे लक्षात आले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती स्वतःहून निघून गेल्याचे दिसून आले.

पुढे पोलीस तपासात फारसे यश आले नाही. त्यानंतर 2019 मध्ये, तिच्या वडिलांनी उच्च न्यायालयात एक रिट याचिका दाखल केली, यामध्ये न्यायालयाने पोलिसांना महिला सुरक्षा आणि मानवी तस्करीविरोधी पथकाची मदत घेण्याचे निर्देश दिले. महिला सुरक्षा शाखेचे उपनिरीक्षक पी हरीश यांनी सांगितले की, या तपासादरम्यान संबंधित महिलेकडे कॅब बुक करण्यासाठी आणखी एक मोबाईल असल्याची माहिती तिच्या मैत्रिणींनी दिली. त्याआधारे तपास केला असता तिने पुण्यासाठी पहिली ट्रिप घेतले असल्याचे समोर आले.

ईडीच्या छापेमारीने ‘बॉलिवूड’चे धाबे दणाणले; ‘त्या’ इव्हेंटनंतर दिग्गज कलाकार रडारवर

त्यानंतर तिचे आधार कार्ड नुकतेच अपडेट करण्यात आल्याचे समोर आले. आधार अपडेट तपशील वापरून, आम्हाला तिच्या बँक खात्याची माहिती मिळाली. डिजिटल तपास साधनांद्वारे, आम्ही तिच्या नवीन नावाने तिची सोशल मीडिया खाती शोधली. तिच्या इंस्टाग्राम पोस्टवरून ती गोव्यात असल्याचे लक्षात आले. तिने स्वतःला सामाजिक कामांशी जोडून घेतल्याचे दिसून आले. फेशियल रिकग्निशन तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही तिची ओळख पटवली. आम्ही जेव्हा तिच्यापर्यंत पोहचलो तेव्हा तिच्या नव्या नवऱ्याला खरी ओळख कळली. त्यानंतर आम्ही तिला अटक करुन न्यायालयासमोर हजर केले. त्यावेळी स्वतःहून राहण्याची इच्छा व्यक्त केली होती, न्यायालयाने देखील ही विनंती मान्य केली, असेही पी, हरीश यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube