गजब प्रेम कहाणी! भाजप नेत्याची ४५ वर्षीय बायको हवलदाराच्या प्रेमात, 2 कोटींचे दागिने घेऊन फरार

  • Written By: Published:
गजब प्रेम कहाणी! भाजप नेत्याची ४५ वर्षीय बायको हवलदाराच्या प्रेमात, 2 कोटींचे दागिने घेऊन फरार

Woman love Constable In Uttar Pradesh : उत्तर प्रदेश येथील भदोहीमध्ये एक धक्कादायक बादमी समोर आली आहे. येथील भाजप नेत्याची पत्नी पोलीस हवालदार प्रियकरासह पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. (Uttar Pradesh) संबंधित महिलाही भाजपची सदस्य असून यापूर्वी तिने स्थानिक अध्यक्षपदाची निवडणूक लढलेली आहे. धक्कादायक म्हणजे पळून जाताना तिने सोबत अडीच कोटी रुपयांचे दागिने आणि चार लाख रुपयांची रोकडही सोबत नेल्याचा आरोप आहे.

ही ४५ वर्षीय महिला तिच्यापेक्षा १५ वर्षांनी लहान असलेल्या प्रियकरासह पळून गेली. सोबत तिने एका मुलाला नेलं असून दोन मुलांना मागं सोडल्याची माहिती आहे. ३० वर्षीय हवालदार हा भाजप नेत्याच्या घरातच भाडेकरु म्हणून राहत होता. यामध्ये अडीच कोटींचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पत्नी हवालदारासह घरातून पसार झाल्याचा दावा पतीने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत केला आहे. हवालदाराने पैशांसाठी आपल्या पत्नीला फूस लावल्याचा आरोपही त्याने केला. हवालदार तिच्या जीवाला धोका पोहोचवू शकतो अशी चिंताही पतीने व्यक्त केली आहे.

अर्थखात्याचा विरोध तरीही बावनकुळेंच्या संस्थेला 5 कोटींचा भूखंड कवडीमोल दरात; काय आहे प्रकरण?

गोपीगंज नगर येथील भाजप नेत्याने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, साधारण एक वर्षापूर्वी गोंडा येथील विनय तिवारी (उर्फ राज तिवारी) या हवालदाराने त्यांच्या घरात एक खोली भाड्याने घेतली होती. त्याच्या नकळत हवालदार आणि त्याच्या पत्नीचे प्रेम प्रकरण सुरू झालं. हवालदाराने धूर्तपणे पत्नीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. तिचे नको त्या अवस्थेतील फोटो काढून ब्लॅकमेल केलं. ही बाब उघड केल्यास कुटुंबाला खोट्या प्रकरणात गोवण्याची धमकी दिल्याचा दावाही तक्रारदार पतीने केला आहे.

पतीच्या म्हणण्यानुसार, जेव्हा त्याच्यासमोर दोघांमधील प्रेम संबंध उघड झाले, तेव्हा त्याने तरुणाला ताबडतोब घर सोडण्यास सांगितलं. “मी माझ्या पत्नीची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला. परंतु, त्याचा फायदा झाला नाही. कॉन्स्टेबलला हाकलून दिल्यावर, त्याने आमच्यावर सूड उगवत कट रचला. त्याने माझ्या पत्नीला त्याच्यासोबत पळून जाण्यास भाग पाडलं. तिने दोन कोटी रुपये किमतीचे दागिने, चार लाख रुपयांची रोख रक्कम आणि आमच्या सात वर्षांच्या मुलाला सोबत नेलं. असंही पतीचं म्हणणं आहे.

जागावाटपाबाबत मोठी अपडेट! भाजप 155 ते 160, शिंदे अन् अजितदादांना मिळतील इतक्या  जागा

दोघांचा शोध घेण्याचे प्रयत्न करूनही पत्नी आणि हवालदाराचा ठावठिकाणा लागलेला नाही. या घटनेत काही स्थानिक लोकांचा हात असावा असा आरोपही त्यांनी केला. त्याला घराबाहेर काढण्यापूर्वी अनेक वेळा अनुचित वर्तन करताना पकडलं होता आणि ही बाब स्थानिक पोलिसांना कळवण्यात आली होती, असं पतीने सांगितलं. पोलिसांनी गुन्हा दाखल करून महिला आणि हवालदाराचा शोध सुरू केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube