Rain Alert : कडक उन्हाळ्यात गारवा! पुढील 12 तासांत पूर्व भारतात धो-धो पाऊस…

पुढील 12 तासांत अंदमान निकोबारसह इतर राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलायं.

Maharashtra Monsoon

Rain Alert : देशभरातील अनेक राज्यांत कडक उन्हाचे चटके भासत असतानाच एका दिलासादायक बातमी समोर आलीयं. देशातील 17 राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलायं. अंदमान निकोबारसह पूर्व भारतात जोरदार पावसाचा अंदाज (Rain Alert ) व्यक्त करण्यात आलायं. त्यामुळे देशभरातील नागरिकांना कडक उन्हाळ्यात गारवा अनुभवण्यास मिळणार आहे.

बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात मोसमी वारे वाहत असल्याने वाऱ्यांचा दाब उत्तर आणि पूर्व भारताकडे येत आहे. पुढील काही दिवसांत पूर्व भारत आणि दक्षिण भारतातील काही राज्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. पुढील 12 तासांत अंदमान निकोबार बेटासह आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालॅंड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा राज्यांत जोरदार पाऊस बरसणार आहे. त्यामुळे या राज्यांत हवामान विभागाने अलर्ट दिलायं.

NEET पेपरफुटी प्रकरण; पाच आरोपींना 2 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील दोन दिवस संपूर्ण उत्तर भारतात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे, त्यामुळे पुढील 12 तास देशातील अंदमान निकोबारसह इतर राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या अनेक जिल्ह्यांना पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा तडाखा बसणार असून, या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे

follow us