Stock Market : शेअर बाजाराची कासव गतीने सुरुवात; सेन्सेक्स 160 अंकांनी घसरला, शेअर वधारले
Share Market : आज बुधवारी (25 सप्टेंबर) भारतीय शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. (Share Market) सेन्सेक्स 160 अंकांनी घसरला आणि 84,700 च्या वर गेला. त्याच वेळी, निफ्टी 50 अंकांच्या घसरणीसह 25,890-900 च्या जवळ आहे. सुरवातीला सेन्सेक्स 78 अंकांनी घसरला आणि 84,836 वर उघडला आहे
जागतिक बाजारात काय स्थिती?
काल मंगळवारी अमेरिकन बाजार जोरदार वाढीसह बंद झाले. वॉल स्ट्रीटवर, डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज 0.20 टक्क्यांच्या किंचित वाढीसह बंद झाले. S&P 500 निर्देशांक 0.25 टक्क्यांनी वाढला आणि टेक-केंद्रित निर्देशांक Nasdaq 0.56 टक्क्यांनी वाढला आहे. जपानचा निक्केई सपाट आहे. परंतु, टॉपिक्स 0.3 टक्क्यांनी वर आहे. दक्षिण कोरियाचा कोस्पी 0.4 टक्के आणि कोस्डॅक 0.43 टक्क्यांनी वधारत आहे. हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक वाढीसह सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत.
पंडित जसराज यांच्या पत्नी मधुरा पंडित जसराज यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
सुरुवातीच्या व्यवहारात, सेन्सेक्सवरील सुमारे 20 शेअर्स लाल रंगात व्यवहार करत आहेत. सुरुवातीच्या सत्रात एशियन पेंट्समध्ये सुमारे 0.80 टक्क्यांची सर्वात मोठी घसरण झाली. टेक महिंद्रा, एचसीएल टेक, इन्फोसिस आणि टीसीएस सारख्या मोठ्या आयटी शेअर्समध्ये घसरण झाली. तर, दुसरीकडे, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनचे शेअर्स 4 टक्क्यांहून अधिक वाढले. महिंद्रा अँड महिंद्रा आणि टाटा स्टील या शेअर्समध्येही चांगली वाढ झाली आहे.
निव्वळ खरेदीदार
NSE वर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार म्हणजेच FII 24 सप्टेंबर 2024 रोजी निव्वळ विक्रेते होते आणि त्यांनी 2784.14 कोटी रुपयांचे शेअर्स विकले. या कालावधीत, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार म्हणजे DII निव्वळ खरेदीदार होते आणि त्यांनी 24 सप्टेंबर 2024 रोजी 3868.31 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.