महुआ मोईत्रांनी लाच घेऊन प्रश्न विचारले; तृणमूलच्या स्टार खासदारावर भाजपचा आरोप

महुआ मोईत्रांनी लाच घेऊन प्रश्न विचारले; तृणमूलच्या स्टार खासदारावर भाजपचा आरोप

नवी दिल्ली: तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांनी लाच घेऊन संसदेत प्रश्न विचारले, असा गंभीर आरोप भाजप (BJP) खासदार निशिकांत दुबे यांनी केला आहे. अदानी समूहाविरोधात प्रश्न विचारून उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांना फायदा करून देण्याचा प्रयत्न केला, असं दुबे यांनी म्हंटलं आहे. याबाबत दुबे यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे, तसंच महुआ मोईत्रा यांना तात्काळ निलंबित करण्याचीही मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अॅड. जय अनंत देहाद्री यांनी त्यांना लिहिलेल्या पत्राच्या आधारे त्यांनी ही तक्रार केली आहे. या प्रकरणावर बोलताना महुआ मोईत्रा यांनी म्हटले आहे की मी कोणत्याही प्रकारच्या चौकशीचे स्वागत करते. (Trinamool Congress MP Mahua Moitra took bribe and asked questions in Parliament)

प्रश्न विचारण्याच्या बदल्यात हिरानंदानी यांनी महुआ यांना रोख रक्कम आणि भेटवस्तू दिल्या. 2019 ची निवडणूक लढवण्यासाठी दर्शन यांनी महुआला 75 लाख रुपये दिले होते. याशिवाय त्यांनी महुआ यांना महागडा आयफोनही दिला होता. महुआ यांना खासदार म्हणून मिळालेल घरही दुरुस्त करून घेतले होते. दर्शन यांना आपल्या लोकसभेच्या खात्याचा अॅक्सेस दिला होता, असेही आरोपात म्हटले आहे.याशिवाय 2021 मध्ये दर्शन यांनी महुआ यांना 2 कोटी रुपये दिले. आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये अदानी आणि पंतप्रधान मोदींना टार्गेट करण्यासाठी हे 2 कोटी रुपये देण्यात आले होते. हे प्रश्न एकतर दर्शन यांनी स्वतः पोस्ट केले होते किंवा महुआ यांनी दर्शना यांच्या सांगण्यावरून पोस्ट केले होते. 2019 ते 2023 दरम्यान विचारण्यात आलेल्या 61 प्रश्नांपैकी 50 प्रश्न त्यांच्या सांगण्यावरून विचारण्यात आले.

2 बीएचके घर, 400 रुपयांत सिलिंडर, 5 लाखांचा विमा… जाहीरनाम्यात BRS चा आश्वासनांचा पाऊस

पैशांच्या बदल्यात प्रश्न हा IPC 120-A अंतर्गत गुन्हा आहे. यापूर्वी काही खासदांरांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. याच अंतर्गत आता दुबे यांनी महुआ यांच्याविरोधात चौकशी समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे. चौकशी समितीचा अहवाल येईपर्यंत त्यांना निलंबित करण्यात यावं असंही त्यांनी म्हंटलं आहे.

शहीद अग्निवीरच्या ‘गार्ड ऑफ ऑनर’चा वाद चिघळला; सैन्याचं स्पष्टीकरण पण, CM मान जाब विचारणारच

दर्शन हिरानंदानी हे रिअल इस्टेट मॅग्नेट निरंजन हिरानंदानी यांचे पुत्र आणि रिअल इस्टेट व्यवसाय हिरानंदानी ग्रुपचे भावी सीईओ आहेत. त्यांचा ऊर्जा, शिक्षण आणि आरोग्य सेवा या क्षेत्रातही व्यवसाय आहे. नोव्हेंबर 2017: पॅराडाईज पेपरमध्ये त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते. या प्रकरणावर हिरानंदानी यांच्या प्रवक्त्याने सांगितले की, हे आरोप खोटे आहेत. आम्ही व्यवसाय करतो, राजकारण नाही. देशाच्या भल्यासाठी आम्ही सरकारसोबत काम करत आलो आणि यापुढेही करत राहू, असे त्यांनी म्हटले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube