जगन्नाथ रथ यात्रेत मोठी दुर्घटना! वीजेच्या धक्क्यानं 7 जणांचा मृत्यू…

जगन्नाथ रथ यात्रेत मोठी दुर्घटना! वीजेच्या धक्क्यानं 7 जणांचा मृत्यू…

Tripura Rath Accident : त्रिपुरा येथील जगन्नाथ रथ यात्रेत (Tripura Rath Yatra)मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. रथ यात्रेत वीजेच्या धक्काने आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर या घटनेत 10 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ही घटना त्रिपुरामधील उनाकोटी जिल्ह्यातील कुमारघाट येथे घडली आहे.(Tripura Rath yatra Accident 7 death 15 injured high tension wire contact)

Aashadhi Wari 2023 : मुख्यमंत्र्यांसोबत नगर जिल्ह्यातील वारकऱ्याला शासकीय महापूजेचा मान

उनाकोटी जिल्ह्यातील कुमारघाट येथे भगवानजगन्नाथ रथ यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी भगवान बलभद्र, देवी सुभद्रा आणि भगवान जगन्नाथांची रथ यात्रा मोठ्या उत्साहात साजऱ्या केल्या जातात.

Nashik News: चाळीस लाखांची लाच मागितली ! दिंडोरीचा प्रांताधिकारी एसीबीच्या ‘जाळ्यात’

त्यावेळी घडलं असं की,लोखंडाने बनवलेला रथ हजारो भाविक आपल्या हाताने ओढत होते. याचवेळी हा रथ रस्त्यावरील हाय टेन्शन वायरच्या संपर्कात आला. त्यामुळे संपूर्ण रथामध्ये वीजेचा करंट उतरला. त्यामुळे रथावरील अनेक जणांना वीजेचा धक्का बसला. त्यामध्ये सात भाविकांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 10 ते 15 जण चांगलेच जखमी झाले आहेत.

त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेत आपला जीव गमावलेल्यांच्या नातेवाईकांना चार लाख रुपयांची आर्थिकम मदत देण्याची घोषणा केली. तर या घटनेत 60 टक्क्यांपेक्षा अधिक भाजलेल्यांना एक लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. तसेच 40 टक्क्यांपेक्षा अधिक भाजलेल्यांना 75 हजार रुपयांची मदत देणार असल्याचे यावेळी त्रिपुराचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

त्याचबरोबर माध्यमांशी बोलताना त्रिपुराचे उर्जा मंत्री रतन लाल नाथ यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश देऊन लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube