इंजिनिअरच्या बेडरूममध्ये कोटींचे घबाड, दीड कोटींची रक्कम अन् किचनमध्ये लपविलेले सोने-हिऱ्याचे दागिने

इंजिनिअरच्या बेडरूममध्ये कोटींचे घबाड, दीड कोटींची रक्कम अन् किचनमध्ये लपविलेले सोने-हिऱ्याचे दागिने

Bihar News :  बिहारमध्ये श्रीकांत शर्मा या अभियंत्याच्या घरात टाकलेल्या छाप्यात पोलिसांना कोट्यावधींचे घबाड हाती लागले आहे. हनुमान नगर येथील त्याच्या घरातून दीड कोटींची रोकड, लाखो किमतीचे सोन्याचे आणि हिऱ्यांचे दागिने तसंच कोट्यवधी रुपयांच्या जमिनीची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान, या छाप्यानंतर आणि छाप्यात सापडलेल्या रक्कमेनंतर बिहारमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

शर्मा हे बिहार सरकारच्या रस्ते बांधकाम आणि इतर वस्तू विभागांमध्ये कार्यरत होते. बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास एक पथक शर्माच्या घरी पोहोचले होते. सहा अधिकारी घरात शिरले आणि त्यांनी ड्रॉइंग रूम, किचन आणि बेडरूमची झडती घेतली. या टीमने किचनमधून दागिने जप्त केले आहेत, तर बेडरूममधून रोख रक्कम आणि ड्रॉईंग रूममधून मोक्याच्या प्लॉटची कागदपत्रे जप्त केली आहेत.

अनेक फ्लॅटची कागदपत्रेही जप्त केली

छाप्याच्या वेळी श्रीकांत शर्मा स्वतःही घरी उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, छापा टाकणाऱ्या पथकाने काहीही सांगण्यास नकार दिला. यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेसाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला होता. जमीन खरेदी-विक्रीशी संबंधित तीन-चार करारपत्रेही सापडली असून, त्यात भागलपूर, देवघर आणि मुंगेर येथील मालमत्ता व्यापाऱ्यांचा सहभाग समोर येत आहे. छापा टाकणाऱ्या पथकाला अनेक फ्लॅटची कागदपत्रेही सापडली आहेत. यात अभियंत्याने लाखोंची गुंतवणूक केली असल्याचे समोर येत आहे.

राष्ट्रवादी, शिवसेनेचा एक गट सत्तेत तर दुसरा विरोधात अन् भाजप.., संभाजीराजेंचा घणाघात…

बिहारमधील एका बड्या नेत्याचे कनेक्शन

अभियंता श्रीकांत शर्मा हे बिहारमधील बड्या नेत्याच्या जवळचे मानले जातात. विविध विभागात बदली-पोस्टिंगसाठी शर्माच्या घरी रांगा लागल्या होत्या. जास्त बोली लावणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येत होते. श्रीकांत शर्माच्या घरावर टाकलेल्या धाडीने बड्या राजकीय नेत्यांनाही हादरवून सोडले आहे.

भाजपच्या ट्विटनंतर राघव चड्डांचा पलटवार! म्हणाले, रामचन्द्र कह गए सिया से…

राजकीयदृष्ट्या या छाप्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत. सत्तेच्या बिघडलेल्या समीकरणाबाबतही छाप्यांची कारवाई होताना दिसत आहे. विक्रमशिला पुलाला समांतर पूल बांधण्याचे कामही श्रीकांत यांच्या देखरेखीखाली झाल्याचे सांगितले जाते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube