“मन की बात” नव्हे, “जन की बात” ऐका; सरकारपेक्षा इंग्रज बरे होते म्हणण्याची वेळ आली – उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray Supports CJP Protest, मी पहिल्या दिवसापासून अभिजीत दिपके आणि सोनम वांगचुक यांच्या सोबत उभा आहे.

Uddhav

Uddhav Thackeray Supports CJP Protest: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पुन्हा एकदा जाहीर पाठिंबा देत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. जंतरमंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची 21 जुलै रोजी भेट घेतल्यानंतर ठाकरे यांनी मंगळवारी (22 जुलै) पत्रकार परिषदेत सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. उद्धव ठाकरे म्हणाले की, “मी पहिल्या दिवसापासून अभिजीत दिपके आणि सोनम वांगचुक यांच्या सोबत उभा आहे. सरकार ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांशी वागत आहे, ते लोकशाहीला धरून नाही.”

मुंबईतील व्यक्तीकडून आंदोलकांसाठी जेवण, झोमॅटो रायडरने भर पावसात पोहोचवलं; दिल्लीतील आंदोलनात माणुसकीचे दर्शन

राहुल-प्रियंका गांधी यांच्यासोबत गैरवर्तनाचाही उल्लेख

ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याशी पोलिसांनी केलेल्या गैरवर्तनाचाही उल्लेख केला. ते म्हणाले, “काल राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासोबतही सरकारने जे गैरवर्तन केले, त्यांना आणि काँग्रेस खासदारांना बळजबरीने आंदोलन स्थळावरुन हटवले, अशा वर्तनामुळेच आता जनतेच्या मनात ‘या सरकारपेक्षा इंग्रज बरे होते’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.”

जंतर मंतरवरील लाठीचार्जनंतर आंदोलन चिघळले; राहुल गांधींचा पंतप्रधान निवासाबाहेर ठिय्या, शरद पवार-सुप्रिया सुळे जंतर मंतरवर दाखल

‘मन की बात’ ऐकवण्यापेक्षा ‘जन की बात’ ऐका

केंद्र सरकारवर निशाणा साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, “सरकारच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे. जनता ही हवा उतरवल्याशिवाय राहणार नाही. सरकारने विद्यार्थ्यांशी वेळेत चर्चा केली असती, तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती.” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचा अप्रत्यक्ष उल्लेख करत ठाकरे म्हणाले, “फक्त स्वतःची ‘मन की बात’ लोकांना बळजबरीने ऐकवण्यापेक्षा ‘जन की बात’ ऐकून घेतली पाहिजे.”

सिंधू जल करारावर भारताची ठाम भूमिका; चिनाबवरील 5,000 मेगावॅट जलविद्युत प्रकल्पांना वेग

“पाकिस्तानशी चर्चा करता, पण विद्यार्थ्यांशी नाही”

सरकारच्या धोरणांवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “सरकार पाकिस्तानसोबत चर्चा करण्यास तयार आहे; पण स्वतःच्या विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यास तयार नाही. उलट त्यांच्या मागण्या ऐकण्याऐवजी त्यांच्यावर लाठीचार्ज केला जात आहे. ही लोकशाहीसाठी अत्यंत चिंताजनक बाब आहे.”

CJP आंदोलकांवर लाठीचार्ज आणि अश्रूधुरानंतर प्रियंका गांधींचा सरकारवर हल्लाबोल!

विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा कायम

जंतरमंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण पाठिंबा असल्याचे पुन्हा स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकून त्यांच्याशी संवाद साधण्याची जबाबदारी सरकारची असून, दडपशाहीऐवजी चर्चेचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन त्यांनी केले.

follow us

संबंधित बातम्या