Uddhav Thackeray नंतर पवारांनाही निवडणूक आयोग देणार धक्का?

Uddhav Thackeray नंतर पवारांनाही निवडणूक आयोग देणार धक्का?

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांना धक्का देत शिवसेना नाव आणि चिन्ह हे दोन्हीही एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय जाहीर केला. आता त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणूक आयोग धक्का देण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.

कोणत्याही पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा देण्यासाठी काही निकष, नियम केंद्रीय निवडणूक आयोगाने घातलेले आहेत. त्यातील सर्वांत महत्त्वाचा निकष म्हणजे संबंधित पक्षाच्या उमेदवारांना चार किंवा त्यापेक्षा अधिक राज्यांमध्ये एकूण लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत किमान ६ टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीत किमान २ टक्के जागा या पक्षाने जिंकणे गरजेचे आहे. लोकसभेमध्ये या पक्षाचे तीन राज्यांत मिळून कमीतकमी ११ खासदार निवडून येणे गरजेचे आहे.

Devendra Fadanvis यांनी राष्ट्रवादीच्या तीन आमदारांना एकाच वेळी केलं खूश!

या संदर्भात निवडणूक आयोगाने २०१६ साली राष्ट्रीय पक्षाच्या बाबतीतील नियमांत बदल केला आहे. या नवीन नियमामुळे राष्ट्रीय पक्षाच्या दर्जा हा आता पाचऐवजी दहा वर्षांनी रिव्हयू करण्यात येणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा पुन्हा एकदा तपासून पाहणार असल्याचे म्हटले आहे. कारण निवडणूक आयोगाला असे वाटत आहे की आता राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून सर्व गोष्टींची पूर्तता करत नाही. त्यामुळे त्यांचा दर्जा का काढून घेण्यात येऊ नये म्हणून त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी बोलावणार असल्याची माहिती असून यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका निवडणूक आयोग समजून घेणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube