Explainer : कंपन्या, स्मशानभूमी बंद; युद्धामुळे महाग झालेल्या गॅसने देशासह पुण्याचा बिघडवला ‘खेळ’

US -Iran War Impacts On India आखातात वाढत्या तणावाचा भारतावर काय परिणाम परिस्थिती दीर्घकाळ अशीच राहिली तर, संकट किती खोलवर जाऊ शकते?

  • Written By: Published:
Explainer : कंपन्या, स्मशानभूमी बंद; युद्धामुळे महाग झालेल्या गॅसने देशासह पुण्याचा बिघडवला 'खेळ'

युद्धाचा गॅस आयातीवर परिणाम

आखाती देशातील वाढत्या तणावामुळे भारताच्या फ्युल गॅस पुरवठ्यावर आणि त्याच्या वापरावर दबाव वाढला आहे. याचे एक प्रमुख कारण म्हणजे भारताला लागणाऱ्या एकूण गरजेच्या अंदाजे 60 % गॅस परदेशातून आयात करतो, आखाती देशांमधून मोठ्या टँकर जहाजांद्वारे समुद्रमार्गे भारतात गॅसची वाहतूक केली जाते. मात्र, 1 मार्चपासून, होर्मुझच्या सामुद्रधुनीत वाढत्या तणावामुळे गॅस पुरवठा विस्कळीत झाला आहे. हा सागरी मार्ग जगातील सर्वात महत्वाच्या ऊर्जा वाहतूक मार्गांपैकी एक मानला जातो. US -Iran War Impacts On India

फ्यूल गॅस आणि उपयोग

फ्यूल गॅस म्हणजे असा गॅस ज्याचा वापर इंधन म्हणून केला जातो. ज्यात एलपीजी, एलएनजी, सीएनजी आणि पीएनजी असे अनेक प्रकार आहेत. या गॅसचा वापर घरगुती स्वयंपाकाचा गॅस, उद्योग, वाहने, वीज निर्मिती आणि शहरांमध्ये पाईपद्वारे गॅस पुरवठ्यासाठी वापरले जातात. यापैकी काही गॅस कच्च्या तेलाच्या शुद्धीकरणादरम्यान बाय प्रॉडक्ट म्हणून मिळवले जातात, तर काही नैसर्गिक गॅस म्हणून जमिनीतून काढले जातात. भारत या गॅसचे उत्पादन होते मात्र, गरज असलेल्या मागणीचा मोठा हिस्सा आयातीवर अवलंबून आहे.

युद्धामुळे तेलाचा भडका! कच्च्या तेलाच्या किंमती 110 डॉलर प्रति बॅरल पार, जगावर मंदीचं सावट?

युद्धाचे भारतावर परिणाम काय?

1. गुजरातमध्ये 100 कारखाने बंद

गॅस पुरवठ्यातील व्यत्ययाचा परिणाम आता भारतातील उद्योगा विश्वावरही जाणवू लागला आहे. फ्यूल सप्लाय खंडित झाल्यामुळे गुजरातमधील मोरबी येथील जवळपास 100 कारखान्यांना उत्पादन थांबवावे लागल्याचे समोर आले आहे. हे सर्व युनिट सिरेमिक उद्योगाशी संबंधित आहेत. मोरबी हे टाइल आणि घड्याळ उत्पादनाचे एक प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाते आणि जगातील सर्वात मोठ्या सिरेमिक उत्पादन केंद्रांपैकी एक आहे. जर फ्यूल गॅस पुरवठा लवकरच सामान्य झाला नाही तर येत्या काही दिवसांत सुमारे 400 हून अधिक युनिट्स बंद पडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

2. पुण्यातील गॅस-आधारित स्मशानभूमींवर परिणाम

महाराष्ट्रातील पुणे येथे गॅसच्या टंचाईमुळे, महानगरपालिकेने 18 गॅस-आधारित स्मशानभूमी तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गॅस पुरवठा सामान्य होताच या स्मशानभूमी पुन्हा सुरू केल्या जातील असे महानगरपालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Israel Iran War : इराण सहा महिने लढू शकतो…, IRGC ने दिला इस्रायल आणि अमेरिकेला अल्टिमेटम

3. इंडक्शन कुकरच्या मागणीत तिप्पट वाढ

स्वयंपाकाच्या गॅसच्या वाढत्या किमती आणि भविष्यातील पुरवठ्याबाबत अनिश्चिततेचा परिणाम बाजारपेठेवर होऊ लागला आहे. अनेक शहरातील किरकोळ बाजारपेठांमध्ये, विशेषतः कोलकाता येथील चांदणी मार्केट आणि एज्रा स्ट्रीटमध्ये इंडक्शन कुकरसारख्या इलेक्ट्रिक स्वयंपाकघरातील उपकरणांची विक्री तिप्पट झाली आहे. केंद्र सरकारने स्वयंपाक गॅसच्या किमती वाढवण्याची घोषणा केल्यापासून विक्रीतील ही वाढ सुरू झाल्याचे दुकानदारांच्या मत आहे.

4. स्वयंपाकाचा गॅस महागला

आखाती देशातील वाढत्या तणावाचा परिणाम घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरवरही झाला असून, तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 60 रूपयांची तर, व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत 115 रूपयांची वाढ केली आहे.

follow us