करवाचौथच्या रात्री भयंकर घडलं! एकाच वेळी 12 नववधू गायब; घरचे बेशुद्ध, दारं उघडी अन्…

करवाचौथच्या रात्री तब्बल 12 घरांमधील नववधूंनी लाखो रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने घेऊन पलायन केलं.

Uttar Pradesh Bride Run Away

12 Bride Run Away On Karva Chauth : करवाचौथच्या पवित्र रात्री संपूर्ण देशभर विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास धरून व्रत करतात. अशातच उत्तर प्रदेशातील अलीगड येथे घडलेल्या एका घटनेने नात्यांवरील विश्वासच खिळखिळा केलाय. या रात्री एकाच वेळी तब्बल 12 घरांमध्ये दु:खाचं सावट आलं. कारण या सर्व कुटुंबांच्या नव्या नव्या आलेल्या नववधूंनी करवाचौथचा व्रत ठेवून, चंद्रदर्शन करून, पतीची आरती उतारल्यानंतर घरच्यांना झोपेचं औषध दिल. त्यानंतर लाखो रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने घेऊन पलायन केलं.

करवाचौथच्या रात्रीच…

ही धक्कादायक घटना अलीगडमधील (Uttar Pradesh) सासनी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणात आतापर्यंत चार स्वतंत्र एफआयआर दाखल करण्यात आल्या असून, ही कृती एक संघटित ठक रॅकेटची असल्याचे स्पष्ट झाले आहे. तपासात समोर आले की, या सर्व नववधू बिहार आणि झारखंड राज्यांतून आणल्या गेल्या (Bride Run Away) होत्या. काही एजंटने ‘गरीब पण संस्कारी मुली’ अशा नावाखाली त्यांना त्या भागातील (Crime News) अविवाहित पुरुषांशी लग्न लावून दिलं होतं. प्रत्येक लग्नासाठी 80 हजार ते दीड लाख रुपये दलालांनी घेतले (Karva Chauth) होते.

 ‘लुटेरी दुल्हन’

शादी झाल्यानंतर या 12 मुलींनी काही दिवसांतच सासरी सर्वांचं मन जिंकलं होतं. कोणी सासूसोबत मंदिरात जात होतं, तर कोणी नवऱ्याबरोबर शेतावर. करवाचौथच्या दिवशी सगळ्यांनी मेहेंदी लावली, पूजा केली आणि घर सजवलं. रात्री व्रत संपल्यावर जेवणाच्या वेळी त्यांनी घरच्यांसाठी स्वतः स्वयंपाक तयार केला. त्याच अन्नात नशेचं औषध मिसळलं. थोड्याच वेळात सर्व घरचे बेशुद्ध पडले. त्या सर्व विवाहित महिलांनी आपली बॅग बांधून रात्रीच घर सोडलं. सकाळी जेव्हा कुटुंबीयांना शुद्ध आली, तेव्हा लॉकर रिकामे, कपाटं उघडी आणि दारं अर्धवट उघडी, मात्र सुनबाई घरात नव्हती.

एजंट सुद्धा झाले गायब

या विवाहांमध्ये दलालांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. हे दलाल बिहार-झारखंडमधील मुली गरीब असल्याचं सांगून लोकांना पटवत होते. पण ज्या क्षणी या मुली पळाल्या, त्याच क्षणी दलालांचे मोबाइल नंबर बंद झाले. काही नंबरवर इतर लोक बोलत असल्याचं आढळलं. त्यामुळे पोलिसांना समजलं की हा प्रकार पूर्वनियोजित होता. पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे की, या 12 लुटेरी नववधूंनी मिळून सुमारे 30 लाख रुपयांहून अधिक मालमत्ता लंपास केली आहे. यात सोन्या-चांदीचे दागिने, रोकड, मोबाईल आणि दहेजातील रक्कम यांचा समावेश आहे. एका पीडिताने सांगितलं की, लग्नाला फक्त दहा दिवस झाले होते. करवाचौथच्या रात्री तीने इतक्या भावनेने पूजा केली की सगळे भावूक झाले. पण दुसऱ्या दिवशी पाहिलं तर घर रिकामं होतं.

पोलिसांची तपास मोहीम सुरू

सासनी गेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल होताच इतर सर्व पीडितही पोहोचले. पोलिसांनी लगेचच हा संगठित ठगगिरीचा रॅकेट असल्याचं ओळखलं. एएसपी मयंक पाठक यांनी सांगितलं की, हे रॅकेट बिहार, झारखंड आणि पश्चिम यूपीमध्ये सक्रिय आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी अनेक विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. पोलिसांनी बिहार-झारखंडमधील काही जिल्ह्यांशी संपर्क साधला असून, दलालांचे फोटो आणि कागदपत्रे तपासली जात आहेत. तपास यंत्रणांच्या मते, हा प्रकार नवीन नाही.

follow us