Video : मोदी जेवढे वर्ष PM तेवढे वर्ष नेहरू देशासाठी तुरुंगात; मोदींना आव्हान देत प्रियंका गांधी थेट नडल्या

Priyanka Gandhi वंदे मातरम् गीत 150 वर्षांपासून देशाच्या आत्म्याचा भाग आज यावर चर्चा करून सरकार काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे.

  • Written By: Published:
Video : मोदी जेवढे वर्ष PM तेवढे वर्ष नेहरू तुरुंगात; मोदींना आव्हान देत प्रियंका गांधी थेट नडल्या

Priyanka Gandhi Vadra On Vande Mataram : लोकसभेत “वंदे मातरम्” या विषयावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान काँग्रेस नेत्या  प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी भाजप नेत्यांना पंडित जवाहरलाल नेहरूंचा अपमान करणाऱ्या सर्व गोष्टींची संपूर्ण यादी तयार करण्याचे थेट आव्हान दिले आणि त्याबद्दल उघडपणे चर्चा करण्यास तयार असल्याचे सांगितले.  तुम्ही वंदे मातरमवर वाद घालत आहात, पण त्याच वेळी तुम्ही देशाच्या पहिल्या पंतप्रधानांचा सतत अपमान करत आहात. मी भाजपला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अपमानाची संपूर्ण यादी तयार करा आम्ही यावर वाद घालण्यास तयार आहोत असे आव्हान प्रियंका गांधी यांनी यावेळी दिले.

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ इंग्रजांसाठी कर्दनकाळ ठरले; गांधींनी म्हटले होतं मधूर गीत

मोदी जेवढे वर्ष PM तेवढे वर्ष नेहरू देशासाठी तुरुंगात घालवली

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट हल्लाबोल करत प्रियंका गांधी म्हणाल्या की, संविधान सभेने मंजूर केलेल्या वंदे मातरम् च्या स्वरूपावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे हे रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, मौलाना आझाद आणि भीमराव आंबेडकर यांसारख्या महान नेत्यांचा अपमान आहे. पंतप्रधान मोदी (PM Modi) 12 वर्षांपासून देश चालवत आहेत, मात्र, एवढीच वर्षे नेहरूंनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी तुरुंगात घालवला आहे. Priyanka Gandhi Vadra On Vande Mataram

आम्ही देशासाठी आहोत, तुम्ही निवडणुकीसाठी आहात 

भाजपवर हल्लाबोल करताना प्रियंका म्हणाल्या की, आम्ही देशासाठी आहोत, तुम्ही निवडणुकीसाठी आहात असा जोरदार प्रतिप्रहार केला. संसदेत वंदे मातरम् वर चर्चा करण्याची गरज का? असा प्रश्न उपस्थित केला. जे गीत 150 वर्षांपासून देशाच्या आत्म्याचा भाग आहे आणि स्वतंत्र भारतात 75 वर्षांपासून लोकांच्या हृदयात वास्तव्य करत आहे. आज यावर चर्चा करून सरकार काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे? सत्ताधारी पक्षाने लोकांच्या जबाबदाऱ्यांवर लक्ष केंद्रित करावे आणि अशा मुद्द्यांवर वाद निर्माण करू नये, असा सल्लादेखील प्रियंका गांधी यांनी दिला.

ठाकरेंचे 20 आमदारही भाजपच्या गळाला… आदित्य ठाकरेंच्या दाव्यानंतर फडणवीसांचं प्रत्युत्तर

पंतप्रधान चांगले वक्ते, पण त्यांचे तथ्य कमकुवत 

वंदे मातरम् वर मोदींनी केलेल्या भाषणाचे प्रियंका गांधींनी कौतुकही केले. त्या म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण प्रभावी होते, परंतु त्यात तथ्यांचा अभाव होता. पंतप्रधानांनी वंदे मातरम् चा इतिहास सांगताना काही तथ्ये वगळली. यावेळी त्यांनी 1896 मध्ये काँग्रेस अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत गायल्याचे निदर्शनास आणून दिले. वंदे मातरम् हे मूळतः बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी दोन श्लोकांसह रचले होते आणि 1882 मध्ये आनंदमठ या कादंबरीत त्यात आणखी चार श्लोक जोडले गेले होते असेही प्रियंका गांधींनी स्पष्ट केले.

आजचे पंतप्रधान आता पूर्वीसारखे राहिले नाहीत

सध्याचे सरकार वर्तमानावर किंवा देशाच्या भविष्यावर लक्ष केंद्रित करत नसून, सरकार वारंवार इतिहासाचा उलगडा करून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळी प्रियांका गांधींनी पंतप्रधान मोदी आता पूर्वीसारखे राहिले नाहीत आणि त्यांची धोरणे देशाला कमकुवत करत असल्याचाही दावा प्रियंका गांधी यांनी सरकारवर हल्लाबोल करताना केला. सत्ताधारी पक्षातील अनेक नेतेही याच्याशी सहमत आहेत, म्हणूनच ते गप्प आहेत. जनता महागाई आणि बेरोजगारीसारख्या समस्यांनी वेढलेली आहे, परंतु सरकारकडे कोणतेही उपाय नाहीत.

follow us