Hariyana Violence : व्हायरल व्हिडिओ अनेकांनी पाहिल्यानंतरच नूहमध्ये हिंसाचार..,

Hariyana Violence : व्हायरल व्हिडिओ अनेकांनी पाहिल्यानंतरच नूहमध्ये हिंसाचार..,

हरियाणामधील नूहमध्येही हिंसाचाराची मोठी घटना घडल्याचं समोर आलं होतं. या हिंसाराचाप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत 10 पेक्षा अधिक गुन्हे दाखल केले आहेत. हिंसाचाराच्या घटनेबाबत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या असून व्हायरल झालेल्या व्हिडिओची पोलिसांकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. चिथावणीखोर वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरच नूहमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्याचं समोर आलं आहे. व्हायरल व्हिडीओ आतापर्यंत तब्बल ५० लाख लोकांनी पाहिले आहेत. यासोबतच २० हजार लोकांनी ते शेअर देखील केले आहेत. लाइक आणि कमेंट देखील हजारोंमध्ये आहेत

नेमकं काय घडलं?

नूहमध्ये ब्रिजमंडळ यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याआधी मोनू मानेसर याने एक व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. व्हिडिओमध्ये तो स्वतः यात्रेला उपस्थित राहणार असल्याचं मोनूने सांगितलं होतं. तसेच व्हिडीओमध्ये मोठ्या संख्येने लोकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आलं होतं.

चीनमध्ये फक्त दोनच तास फोन वापरण्याची परवानगी? कायदाच पारित होणार…

या व्हिडीओनंतर आणखी एक व्हिडीओ समोर आला, एहसान मेवाती पाकिस्तानी नावाने सोशल मीडिया अकाउंटवरून हा व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये अनेक चिथावणीखोर वक्तव्य करण्यात आले होते. हा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला हा व्हिडीओ एका पाकिस्तानी तरुणाने सोशल मीडियावर शेअर केला होता.

Poet Gaddar Death : प्रसिद्ध गायक गुम्मडी विठ्ठल राव उर्फ गदर यांचं निधन!

नूहमध्ये 31 जुलै रोजी ब्रिजमंडळ यात्रा आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर फरीदाबादमधून बिट्टू बजरंगी याच्या समर्थकांनी यात्रेत सहभागी होण्याचं आवाहन केलं. या व्हिडीओत देखील अनेक चिथावणीखेर वक्तव्य करण्यात आली होती, व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल झाला. काही तासातच व्हिडीओ पाहून लोक एकत्र आले आणि हिंसाचार सुरू झाला.

आमचा पक्ष अन् परिवार व्यवस्थित, जयंत पाटलांबद्दल सांगायला मी मनकवडा नाही; अजितदादांची चौफेर फटकेबाजी

दरम्यान, सोशल मीडियावर चिथावणीखेर व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी नूह, पलवल आणि फरीदाबाद येथे तब्बल १५ गुन्हे नोंदवण्यात आले असून यामध्ये फरीदाबाद पोलिसांनी आयटी अॅक्ट आणि इतर कलमांखाली बिट्टू बजरंगी आणि सादिक नावाच्या तरुणांना अटक देखील केली. बिट्टूला पोलीस स्टेशनमधून जमीन मिळाला. तर पलवल पोलीसांनी या प्रकरणी एकही आरोपीला अटक केली नाही.

नूह येथे पोलीसांनी सोशल मीडिया व्हिडीओ पोसट आणि व्हायरल केल्याप्रकरणी १० गुन्हे नोंदवले आहेत तर ६० आरोपींना अटक केली आहे. २५ जुलै ते ३१ जुलै यादरम्यान वेगवेगळे व्हायरल व्हिडीओ आतापर्यंत तब्बल ५० लाख लोकांनी पाहिले आहेत. यासोबतच २० हजार लोकांनी ते शेअर देखील केले आहेत. लाइक आणि कमेंट देखील हजारोंमध्ये आहेत..

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube